MP Navneet Rana गॅस दरवाढी विरोधात आक्रमक, चुलीवर भाकरी भाजत व्यक्त केला राग : VIDEO

दरवेळी मोदी सरकारचं कौतुक करणाऱ्या राणा यावेळी मात्र विरोधात 

Updated: Aug 2, 2021, 10:33 AM IST
MP Navneet Rana गॅस दरवाढी विरोधात आक्रमक, चुलीवर भाकरी भाजत व्यक्त केला राग : VIDEO

अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती :अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या सातत्याने चर्चेत असतात. लोकसभेत केलेले भाषण असो किंवा मेळघाट मध्ये केलेले आदिवासी नृत्य तर कधी थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टिकेमूळे त्या नेहमीच चर्चेत असतात. सोशल मिडियावर देखील त्या सक्रिय असल्याने सोशल मिडियावर देखील नेटकरी त्यांना चांगला प्रतिसाद देत असतात. तर कधी त्यांच्यावर टीकाही होत असते. 

नेहमीच मोदी सरकारच आणि खास करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच कौतूक करणाऱ्या खासदार नवनीत राणा यांनी यावेळी मात्र मोदी सरकारचा निषेध केला आहे. आणि त्याला कारणही तसेच आहे. देशात वाढत्या डिझेल, पेट्रोल आणि सिलेंडर गॅसच्या किमती विरोधात नागरीक आक्रमक होत आहे. त्यामुळे लोक वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करून मोदी सरकारचा निषेध करत आहे. अशातच खासदार नवनीत राणा यांनी चुलीवर स्वयंपाक केल्याचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे. 

या व्हिडिओ वर आता नेटकर्यांनी वेगवेगळे मिम्स बनवत घरगुती गॅस सिलेंडरचे प्रचंड दर वाढल्याने खासदार नवनीत राणांनी चुलीवर स्वयंपाक करून केला मोदी सरकारचा निषेध असे कॅप्शन देत खा. नवणीत राणा यांचा व्हिडिओ व्हायरल केला आहे. दरम्यान खा नवणीत राणा यांनी चुलीवर स्वयंपाक केला असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असला तरी त्यांनी मोदी सरकारचा निषेध केला नाही.