खासदार उदयनराजे भोसले पोलीस ठाण्यात हजर

खासदार उदयनराजे भोसले सातारा शहर पोलीस ठाण्यात हजर झाले आहेत. एका उद्योगजकाला खंडणी मागितल्याप्रकरणी उदयनराजेंवर गुन्हा झाला होता. त्यावर कोर्टानं त्यांना अटकपूर्व जामीन नाकारला होता

Updated: Jul 25, 2017, 10:50 AM IST
खासदार उदयनराजे भोसले पोलीस ठाण्यात हजर title=

सातारा : खासदार उदयनराजे भोसले सातारा शहर पोलीस ठाण्यात हजर झाले आहेत. एका उद्योगजकाला खंडणी मागितल्याप्रकरणी उदयनराजेंवर गुन्हा झाला होता. त्यावर कोर्टानं त्यांना अटकपूर्व जामीन नाकारला होता

गेल्या आठवड्यात चार महिन्यानंतर उदयनराजे साता-यात दाखल झाले. त्यांनी साताऱ्यात रोड शो केला होता. त्याची जोरदार चर्चा होती. यापार्श्वभूमीवर आज  खासदार उदयनराजे पोलीस ठाण्यात हजर झाले. त्यांना वैद्यकीय तपासणीला जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले आहे. कायदा हातात घेऊ नये संयम राखावा, असे आवाहन खासदार भोसले यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. दरम्यान, उदयनराजे यांना वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात नेण्यात आले आहे. यावेळी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी त्यांच्या समर्थनार्थ जमा होऊ लागली.