MPSC Recruitment 2023: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! 1037 जागांसाठी नोकरभरती; अर्ज करण्यासाठी उरले शेवटचे काही तास

या नोकरभरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या नोकरभरतीसाठी कोणत्या अटी आहेत, कोणत्या पदांसाठी ही भरती केली जात आहे जाणून घ्या यासंदर्भातील सविस्तर माहिती

Updated: Jan 11, 2023, 06:10 PM IST
MPSC Recruitment 2023: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! 1037 जागांसाठी नोकरभरती; अर्ज करण्यासाठी उरले शेवटचे काही तास title=
mpsc recruitment 2023 openings for 1037 posts

MPSC Recruitment 2023 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून लवकरच नोकरभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. उद्योग निरीक्षक गट-क (Group-C), उद्योग संचालनालय, दुय्यम निरीक्षक (गट-क) राज्य उत्पादन शुल्क, कर सहाय्यक (गट-क), लिपिक-टंकलेखक (मराठी) (गट-क), लिपिक-टंकलेखक (इंग्रजी) (गट-क) या पदांसाठी भरती होणार आहे. एकूण एक हजार ३७ पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. पात्र उमेदवारांना यासाठी ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख आज म्हणजेच ११ जानेवारी २०२३ ही आहे.

कोणत्या पदांसाठी किती जागा?

> उद्योग निरीक्षक गट-क, उद्योग संचालनालय - सहा जागा

> दुय्यम निरीक्षक, गट-क, राज्य उत्पादन शुल्क - नऊ जागा

> कर सहाय्यक, गट-क - ४८१ जागा

> लिपिक-टंकलेखक (मराठी) (गट-क) - ५१० जागा

> लिपिक-टंकलेखक (मराठी) (गट-क) - ३१ जागा

शैक्षणिक पात्रता

> उद्योग निरीक्षक (गट-क) उद्योग संचालनालय -  संबंधित पदांनुसार अभियांत्रिकी पदवी किंवा तंत्रज्ञान क्षेत्रामधील अभ्यासक्रमाअंतर्गत येणारी डिप्लोमा किंवा विज्ञान शाखेतील पदवीपर्यंतचं शिक्षण बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी अर्जदाराने पूर्ण केलेल्या असणं आवश्यक आहे.

> दुय्यम निरीक्षक, (गट-क) राज्य उत्पादन शुल्क - संबंधित पदांनुसार पदवीधरपर्यंतचं शिक्षण आवश्यक. पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण असणं आवश्यक आहे.

> कर सहाय्यक, (गट-क) - पदांनुसार पदवीधर आणि मराठी आणि इंग्रजी टायपिंगपर्यंतचं शिक्षण आवश्यक आहे. पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक.

> लिपिक-टंकलेखक (मराठी) (गट-क) - पदांनुसार पदवीधर आणि मराठी टायपिंगपर्यंत शिक्षण आवश्यक, तसेच पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केलेल्या असणं आवश्यक.

> लिपिक-टंकलेखक (इंग्रजी) (गट-क) - पदांनुसार पदवीधर आणि इंग्रजी टायपिंगपर्यंत शिक्षण आवश्यक, तसेच पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केलेल्या असणं आवश्यक.

परीक्षा शुल्क किती?

> ओपन/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस - 544 रुपये

> एससी/ एसटी - 344/- रुपये

> पीडब्ल्यूडी/ महिला - 344/- रुपये

कोणती कागदपत्रं आवश्यक?

> रेझ्युमे (बायोडेटा)

> दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

> शाळा सोडल्याचा दाखला

> जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी बंधनकारक)

> ओळखपत्र (आधारकार्ड, वाहन परवाना, पॅन कार्ड)

> पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्याची शेवटची तारीख

> 11 जानेवारी 2023 (रात्री 11:59 पर्यंत)

कुठे कराल अर्ज?

https://mpsconline.gov.in/candidate या वेबसाईटवरुन वरील पदांसाठी ऑनलाइन अर्ज करता येईल. लिंकवर क्लिक करा.