एसटी कर्मचाऱ्यांना मिळणार पगार, राज्य सरकारकडून महामंडळाला 500 कोटी

 कोरोना आणि लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणित होते एसटी महामंडळ 

Updated: Sep 3, 2021, 07:47 AM IST
एसटी कर्मचाऱ्यांना मिळणार पगार, राज्य सरकारकडून महामंडळाला 500 कोटी  title=

मुंबई : एसटी कर्मचा-यांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. आज एसटी कर्मचाऱ्यांचा पगार होणार आहे. राज्य सरकारकडून महामंडळाला 500 कोटी वितरित करण्यात येणार आहे. महामंडळाला दिलासा देण्यात आला आहे. एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आज एसटी कर्मचा-यांचा पगार होणार आहे. सरकारकडून महामंडळाला 500 कोटींचा निधी वितरित करण्यात येणार आहे. जुलैच्या वेतनाचा प्रश्न सुटला आहे. 

एसटी कर्मचा-यांचा आज पगार होणार आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणित आलेल्या एसटी महामंडळाला राज्य सरकारने गुरुवारी 500 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. यामुळे एसटीच्या 93 हजार कर्मचा-यांचा जुलै या महिन्याचा रखडलेल्या वेतनाचा प्रश्न सुटलाय.. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे एसटी महामंडळाला मोठा दिलासा मिळाला आहे. या मदतीबद्दल परिवहन मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आभार मानलेत.

एसटी कर्मचाऱ्यांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर आवश्यक बाबींसाठी 500 कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्यानंतर हा निधी तातडीने वितरीत करण्यात आला आहे. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 500 कोटी रुपये वितरीत करण्याचे निर्देश दिले व त्यानुसर तातडीने निधी वितरीत करण्यात आला. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोनामुळे मागील दीड वर्षांपासून एसटी महामंडळाला कोट्यवधी रुपयांचा तोटा झालेला आहे. त्यामुळे एसटी महामंडळाचे आर्थिक बजेट पूर्णपणे काेलमडले असून एसटी कर्मचाऱ्यांचे जुलै 2021 महिन्याचे वेतन रखडले आहे. त्यामुळे मान्यता प्राप्त एसटी कर्मचारी संघटनांनी औद्योगिक न्यायालयात धाव घेतली होती. त्यांनतर शनिवारी औद्योगिक न्यायालयाने महामंडळाला झापत 3 सप्टेंबर पर्यंत सर्व एसटी कामगारांचे वेतन करण्याचे आदेश दिले आहेत.