10वी उत्तीर्ण झालायत? एसटी महामंडळात नोकरीसाठी 'येथे' पाठवा अर्ज

MSRTC Recruitment 2024: एसटी महामंडळ धुळे अंतर्गत शिकाऊ उमेदवारांची एकूण 256 रिक्त पदे भरली जाणार आहेत.

Pravin Dabholkar | Updated: May 30, 2024, 01:28 PM IST
10वी उत्तीर्ण झालायत?  एसटी महामंडळात नोकरीसाठी 'येथे' पाठवा अर्ज title=
Jobs in ST Mahamandal

MSRTC Recruitment 2024: दहावी उत्तीर्ण आहात? तुम्ही आयटीआयदेखील केलंय? मग वाट कसली पाहताय? एसटी महामंडळातील भरतीविषयी ऐकलयात का? नसेल तर जाणून घ्या.  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात दहावी, आयटीआय उत्तीर्णांना नोकरीची संधी मिळणार आहे. एसटी महामंडळाच्या धुळे जिल्हा अंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.  

एसटी महामंडळ धुळे अंतर्गत शिकाऊ उमेदवारांची एकूण 256 रिक्त पदे भरली जाणार आहेत. याअंतर्गत मोटर मेकॅनिकची 65 पदे, डिझेल मॅकेनिकची 64 पदे, शीट मेटल वर्करची 28 पदे, वेल्डरची 15 पदे, इलेक्ट्रिशियनची 80 पदे,टर्नरची 2 पदे, मेकॅनिकल/ऑटोमोबाईल इंजिनीअर/डिप्लोमाची 2 पदे भरली जाणार आहेत. मोटर मेकॅनिक, डिझेल मॅकेनिक, शीट मेटल वर्कर, वेल्डर, इलेक्ट्रिशियन आणि टर्नर पदासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून दहावी आणि आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. मेकॅनिकल/ऑटोमोबाईल इंजिनीअर पदासाठी उमेदवारांनी पदवी किंवा डिप्लोमा पूर्ण केलेला असावा. 

निवड झालेल्या उमेदवारांना धुळे येथे नोकरी मिळेल. दरम्यान अर्ज शुल्काविषयी जाणून घेऊया. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकडून 500 रुपये अर्ज शुल्क घेण्यात येईल. मागासवर्गीय उमेदवारांना यात थोडी सवलत देण्यात आली आहे. त्यांच्याकडून 250 रुपये अर्ज शुल्क घेण्यात येईल. 

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज विभागीय कार्यालय , राज्य परिवहन महामंडळ , धुळे – 424001 येथे पाठवायचे आहेत. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. तसेच आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावी लागणार आहेत.  6 जून 2024 ही अर्जाची शेवटची तारीख आहे. या तारखेनंतर आलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्या.

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा