पुणे : ऐन दिवाळीत एस टी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे खासगी बसेसला गर्दी प्रचंड वाढलीय. त्याचवेळी या संपाचा फायदा उठवत खासगी बसेसच्या भांड्यांमध्ये अभूतपूर्व वाढ झालीय.
जमेल तसा प्रवास करण्याची वेळ प्रवाश्यांवर आलीय. पुण्यातील संगमवाडीतून खासगी बसेस सुटतात. संपामुळे प्रवाशांना दिलासा देण्याऐवजी खासगी वाहनधारक प्रवाशांची लूट करीत आहेत.
सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीत संप पुकारला आहे. त्यामुळे दिवाळी साजरी करण्यासाठी गावाला जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत.
अशात मंगळवारी सरकारचा कामावर हजर होण्याचा अल्टीमेटम कर्मचाऱ्यांनी धुडकावून लावला. त्यामुळे आजही प्रवाशांचे हाल होत आहेत. एसटी कर्मचारी दुसऱ्या दिवशीही संपावर ठाम आहेत.
१५ तालुक्यात विखुरलेला चंद्रपूर विभागाचा एस. टी. चा कारभार सध्या थंडावला आहे. राज्यभर शासनाच्या कर्मचारी धोरणाविरोधात एस. टी. कर्मचा-यांनी संप पुकारला आहे. त्यातच दिवाळीनिमित्त प्रवाशांची एकच झुंबड असल्याने हजारो प्रवासी बस स्थानकावर अडकले आहेत.
दुसरीकडे गेली अनेक वर्षे आम्ही सरकारला विविध मागण्यांसंदर्भात निवेदने देत आमच्या मागण्या पुढे रेटत आहोत. मात्र सरकार अडेलतट्टू भूमिका स्वीकारत असल्याने आम्ही आंदोलनाची भूमिका स्वीकारल्याचे कर्मचाऱ्यांचे मत आहे.