अहमदनगर : मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबद खंडपीठाने शिर्डी साईबाबा संस्थान निवडीबर ताशेरे ओढल्याने ग्रामस्थांनी स्वागत केलेय. स्थानिकांना साईबाबा संस्थानावर घेतले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या निवडी विरोधात औरंगाबाद हायकोर्टात दाखल केलल्या याचिकेत हायकोर्टांने निर्देश दिल्यानंतर या निर्णया बद्दल शिर्डीतील ग्रामस्थ आणि साईभक्तांनी समाधान व्यक्त केले आहे.
साई संस्थानवर शिर्डी परीसरातीलच व्यक्तींची नेमणूक व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तर साईंच्या मंदिराचा कारभार बघण्यासाठी खऱ्या साईभक्तांचीच नेमणूक व्हावी, अशी इच्छा साईभक्तांनी व्यक्त केली आहे.