'तुझं हेल्मेट कुठंय?' भररस्त्यात महिलेचा पोलिसाला सवाल; मुंबई पोलिसांनी दिलं उत्तर...

Mumbai Police Video: मुंबई पोलिसाचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. यात एक पोलिस अधिकारी हेल्मेट न परिधान करता जाताना दिसत आहे.

मानसी क्षीरसागर | Updated: Nov 9, 2023, 10:42 AM IST
'तुझं हेल्मेट कुठंय?' भररस्त्यात महिलेचा पोलिसाला सवाल; मुंबई पोलिसांनी दिलं उत्तर...  title=
mumbai police officer riding bike without helmet women ask him tumhara helmet kidhar hai

Mumbai Police Viral Video: वाहन चालवत असताना वाहतुकीचे नियम पाळणे सगळ्यांसाठी बंधनकारक असतात. दुचाकी चालवत असताना हेल्मेट आणि कार चालवत असताना सीटबेल्ट लावणं बंधनकारक आहे. अशावेळी जर आपल्याकडून नियम पाळले गेले नाही तर दंड आकारला जातो. वाहतुकीचे नियम हे सर्वांसाठी सारखेच असतात मग तो सर्वसामान्य व्यक्ती असो किंवा अधिकारी. सोशल मीडियावर एसाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात पोलीस कर्मचारी विना हेल्मेट प्रवास करताना दिसत आहे. (Mumbai Police Video)

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत एक महिला कारमध्ये बसली आहे आणि बाजूने एक पोलीस अधिकारी जात आहे. या पोलिस अधिकाऱ्याने हेल्मेट परिधान केले नाहीये. त्यानंतर कारमध्ये बसलेली महिला त्याला हेल्मेट कुठे आहे? असा प्रश्न विचारत आहे. दोन ते तीन वेळा ती त्याला हाच प्रश्न विचारत आहेत. मात्र, तिच्या या प्रश्नावर उत्तर देता तो तिला दुर्लक्ष करुन पुढे निघून गेला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 

पोलिसाला तुझं हेल्मेट कुठंय असा प्रश्न विचारणाऱ्या महिलेला नेटकऱ्यांनी मात्र चांगलंच धारेवर धरलं आहे. व्हिडिओ पाहत असताना काहींची नजर महिलेवर गेली तेव्हा त्यांनी नोटिस केले की महिलेने स्वतःच सीटबेल्ट घातला नव्हता. पोलिसांना नियम शिकवणाऱ्या या महिलेला नेटकऱ्यांनीच चांगले सुनावले आहे. आधी स्वतः तर हेल्मेट लाव, असं युजर्सनी तिला म्हटलं आहे.

ट्विटरवर 8 नोव्हेंबर रोजी हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, महिला आणि पोलिस अधिकाऱ्यांमध्ये हेल्मेटवरुन क्लेश. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर व्हायरल होतोय. आत्तापर्यंत या व्हिडिओला 1 लाख 29 हजाराहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. 1.8 हजाराहून जास्त लाइक्स मिळाले आहेत. त्याचबरोबर शेकडो युजर्सनी त्याची प्रतिक्रिया दिली आहे. 

व्हिडिओ व्हायरल होताच याची दखल मुंबई पोलिसांनीही घेतली आहे. मुंबई ट्रॅफिक पोलिसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन प्रतिक्रिया दिली आहे. पुढील कारवाईसाठी लोकेशन सांगा, असा रिप्लाय करण्यात आला आहे. तर, लोकानींही त्या खाली कमेंट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईत तुम्ही बोलण्याची प्रथा संपलीये का? पोलिसवाल्याला हेल्मेट घालायला सांगणाऱ्या महिलेना स्वतः सीटबेल्ट लावला नाहीये. हेल्मेटबद्दल विचारण्याच्या नादात अपघात झाला असता, अशी कमेंट एकाने केली आहे.