मुंबई : महाराष्ट्रावरील कोरोनाच्या (Maharashtra Corona) संकटाचं मळभ अधिकच गडद होत चालले आहे. कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालल्याने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडूनही आता सातत्याने नवेनवे अपडेट्स दिले जात आहेत.
गेल्या आठवड्यात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार सर्वाधिक अॅक्टीव्ह (Maharashtra corona active patients) कोरोना रुग्णांच्या संख्येत देशातील टॉप १० जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील ९ जिल्ह्यांचा समावेश होता. आज पुन्हा एकदा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार अजूनही या यादीत ८ जिल्हे महाराष्ट्रातलेच आहेत.
महाराष्ट्रात कोण-कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक अॅक्टीव्ह रुग्ण?
जिल्हा | कोरोनाचे सक्रीय रुग्ण |
पुणे | 59,475 |
मुंबई | 46,248 |
नागपूर | 45,322 |
ठाणे | 35,264 |
नाशिक | 26,553 |
औरंगाबाद | 21,282 |
नांदेड | 15,171 |
अहमदनगर | 7,952 |
The top 10 districts in #India with active #COVID19 cases are Pune, Mumbai, Nagpur, Thane, Nashik, Aurangabad, Bengaluru Urban, Nanded, Delhi, Ahmednagar.
8 of the top 10 districts with active #COVID19 cases are in #Maharashtra
-Secretary, @MoHFW_INDIA#Unite2FightCorona pic.twitter.com/CeOnXd9fM7
— PIB India (@PIB_India) March 30, 2021
महाराष्ट्रासोबतच पंजाब, छत्तीसगड, तामिळनाडू, कर्नाटक, गुजरात या राज्यांमध्ये कोरोनाचा पॉझिटीव्हीटी रेट सर्वाधिक आहे. महाराष्ट्राचा आठवडाभराचा कोरोना पॉझिटीव्हीटी रेट २३ टक्के आहे.
केंद्राने दिलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात सध्या कोरोनाचे ३ लाख ३७ हजार ९२८ अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत ५४ हजार २८३ रुग्णांनी कोरोनामुळे आपला प्राण गमावला आहे. तर २३ लाख ५३ हजार ३०७ रुग्ण कोरोनातून बरे झालेले आहेत.