ठाणे : मुंब्रा बायपासवर दरड कोसळली. ही घटना आज सकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. कौसा येथील रेहमानिया हॉस्पीटलजवळील ही दरड कोसळली.
फायर ब्रिगेड, पोलिसांसह संबंधित यंत्रणा घटनास्थळी असून कोणीही जखमी झालेले नाही. कोसळलेले दगड बाजुला करुन वाहातुक सुरु करण्यात आली आहे.
दरम्यान, भविष्यात हा मार्ग धोकादायक आहे. त्यामुळे तातडीने सुरक्षेबाबत पावले उचलण्याची मागणी होत आहे.