१६ एप्रिलपासून मुंब्रा बायपास रस्ता बंद

१६ एप्रिलपासून दुरुस्तीच्या कामामुळे मुंब्रा बायपास बंद होणार असल्याने होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पालकमंत्री सरसावले आहेत. 

Updated: Apr 15, 2018, 08:53 PM IST
१६ एप्रिलपासून मुंब्रा बायपास रस्ता बंद title=

कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे : १६ एप्रिलपासून दुरुस्तीच्या कामामुळे मुंब्रा बायपास बंद होणार असल्याने होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पालकमंत्री सरसावले आहेत. त्यासाठी एमएमआरडीए, पीडब्ल्यूडी, नॅशनल हायवे तसेच, ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, मुंबई, नवी मुंबई आदी महापालिकांनी त्यांच्या अखत्यारितील सर्व रस्त्यांची युद्धपातळीवर डागडुजी करून वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याचे निर्देश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत.

ठाणे आणि कल्याण दरम्यान सर्वात महत्वाचा रस्ता म्हणजे मुंब्रा बायपास. परंतु या बायपासची आता बायपास करायची वेळ आली आहे. या रस्त्यावर नेहमीच वाहतूक कोंडी दिसते आणि यामुळे नागरिक त्रस्त आहेत. यावर उपाय काढावा अशी मागणी ठाणेंकरांची आहे.

या बाबत आता ठाण्याचे पालकमंत्री सरसावले आहेत.  १६ एप्रिलपासून मुंब्रा बायपास दुरुस्तीचे काम सुरु होणार असल्याने वाहतुकीसाठी बायपास बंद होणार असल्याने होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ही पालकमंत्री सरसावले आहेत.

प्रचंड रहदारीमुळे मुंब्रा बायपासची दुरुस्ती हे नियोजनाचे काम आहे. या सर्वांवर खुद्द पालकमंत्र्यानी एमएमआरडीए, पीडब्ल्यूडी, नॅशनल हायवे कामांसदर्भात निर्देश दिले आहे.

१६ एप्रिलपासून मुंब्रा बायपास रस्ता बंद