अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने पोटच्या मुलाची हत्या

संशयित आणि त्याची प्रेयसी यांचे अनेक दिवसांपासून होते अनैतिक संबंध.

Updated: Jan 4, 2021, 08:39 AM IST
अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने पोटच्या मुलाची हत्या

नाशिक : अनैतिक संबंधाला अडथळा ठरणाऱ्या एका सात वर्षाच्या बालकाचा प्रेयसीच्या मदतीने खुन केल्याची घटना उघडकीस आली आहे. या खून प्रकरणातील मुख्य संशयित सोमनाथ वसंत कुऱ्हाडे आणि त्याची प्रेयसी सुलोचना घनश्याम जाधव या दोघांना आडगाव पोलिसांनी अटक केली आहे. 

संशयित आणि त्याची प्रेयसी यांचे अनेक दिवसांपासून अनैतिक संबंध होते. मात्र सुलोचना हिच्या पहिल्या नवऱ्यापासून झालेल्या मुलाचा सांभाळ तीच करत होती. उपचारादरम्यान या मुलाचा मृत्यू झाला. आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख यांनी या प्रकरणाचा कोणताही पुरावा शिल्लक नसतांना या खुनाचा छडा लावला आहे. 

केवळ अनैतिक संबंधाला अडथळा ठरला म्हणून पोटच्या मुलाचा खून केल्याचा सहभाग असल्याने मातृत्वाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.