संत्र्याच्या मजुरीची किंमत भररस्त्यात मोजावी लागली...

जीव गमावून मोजावी लागली त्यांना संत्र्याच्या मजुरीची किंमत 

Updated: Jan 2, 2022, 09:17 PM IST
संत्र्याच्या मजुरीची किंमत भररस्त्यात मोजावी लागली...  title=

नागपूर : संत्र तोडण्यासाठी जात असलेल्या मजुरांच्या पिकअफ व्हॅनला भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात 4 महिला मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 5 महिलां मजूर गंभीर जखमी झाल्या आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. 

नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यात बोलेरो पिकअप व्हॅनचा भीषण अपघात झाला. काटोल तालुक्यातील ईसापुर-घुबडमेट रस्त्यावर हा अपघात झाला. संत्र्याच्या बागेत संत्री तोडण्यासाठी या महिला जात होत्या. त्याच वेळी हा भीषण अपघात झाला. 

बोलेरो वाहन चालकाचं नियंत्रण सुटलं, त्यामुळे गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झाडावर जाऊन आदळली. अपघातामध्ये गाडीचा अक्षरश: चुराडा झाला आहे. 3 महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर एका महिलेचा रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जात असताना मृत्यू झाला. 

इतर जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. मनीषा सलाम, मंजुळा उईके, कलाताई परतेती व मंजुला धुर्वे अशी मृत महिला मजुरांची नावं आहेत.