नागपूर : दारूबंदी असलेल्या वर्धा आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्यांमध्ये नागपुरमधून मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी केली जाते. या तस्करीकरता दारू विक्रेते नामी शक्कल लढवत असल्याचं समोर आलं आहे. दारू तस्करीकरता एकाने चक्क ३० कप्पे असलेला खास कोटच तयार केला होता.
दारु तस्करीसाठी त्याने ३० कप्प्यांचा कोट तयार केला मात्र, पोलिसांच्या डोळ्यात तो धूळफेक करू शकला नाही.
रत्नाकर नंदनवार असं या दारू तस्कराचं नाव आहे. दारूच्या बाटल्या नेण्यासाठी त्याने कोटमध्ये ३० कप्पे केले तयार केले होते.
आरपीएफ जवानांनी रत्नाकर नंदनवार याला स्टेशनवर पकडलं आणि त्याच्या कोटात १८ बाटल्या जप्त केल्या आहेत.
VIDEO: दारु तस्करीसाठी त्याने बनवला चक्क ३० कप्प्यांचा कोट