एका व्हेंटिलेटवरून आठ रुग्णांना मिळणार प्राणवायू

कोरोनाविरोधातील लढाईला अधिक बळ 

Updated: Apr 4, 2020, 05:34 PM IST
एका व्हेंटिलेटवरून आठ रुग्णांना मिळणार प्राणवायू title=

नागपूर : एका व्हेटिलेटवरून आठ रुग्णांना मिळणार प्राणवायू असे उपकरण नागपूर डॉक्टरांनी शोधले आहे. यामुळे कोरोनाविरोधातील लढाईला अधिक बळ आले आहे. साधारण व्हेंटिलेटरपासून एक इनलेट असतो आणि एक आऊटलेट असता. त्याला ट्यूब लावून आपण एक रुग्णाला व्हेंटिलेट करतो. मात्र आम्ही असं स्पिलटर तयार केलं आहे की एकाच व्हेंटिलेटरवर आठजणांना कृत्रिम श्वासोच्छ्वास पुरविणे शक्य होणार आहे. नागपुरातील न्यू इरा हॉस्पिटलमधून ही संकल्पना प्रत्यक्षात समोर आली आहे. या व्हेंटिलेटरबद्दल राज्यभरातून विचारणा होत आहे. 

इटली, स्पेनमध्ये व्हेंटिलेटर तुटवडा जाणवत आहे. त्यामुळं भारतात कोरोनाचा धोका वाढला तर त्यावर उपाय कसा करावं म्हणून ही संकल्पना आणल्याचे न्यू इरा हॉस्पिटलचे हृदयरोग तज्ञ डॉक्टर आनंद संचेती सांगतात. त्यांच्यासहीत डॉ. निलेश अग्रवाल आणि डॉ. नितिश मिश्रा यांना ही संकल्पना सुचली. त्यानंतर समीर भुसारी यांच्या मदतीने त्यांनी ती प्रत्यक्षात साकारली. 

२४ तासांत १२ कोरोना रुग्णांचा मृत्यू 

देशभरात २४ तासांत १२ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच १७ राज्यांमध्ये १०२३ कोरोनाग्रस्त हे मरकजशी संबंधित असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने दिली आहे. यामुळे मरकजच्या कार्यक्रमामुळे निर्माण झालेली दाहकता लक्षात येऊ शकते. कोरोनाच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी ११ हजार १२ कोटींचा निधी राज्य सरकारांना वितरित करण्यात आल्याचे देखील सांगण्यात आले आहे. 

वैयक्तिक स्वच्छतेची काटेकोर काळजी घ्या तसेच प्रमाणित मास्कचाच वापर करा असे आवाहन देखील केंद्रीय आरोग्य विभागाने केले आहे.