कॉर्पोरेट पार्टीत अश्लील डान्स, अतिउत्साही कर्मचाऱ्यांकडून नर्तकीवर....', नागपूरला कलंक लावणी घटना

Nagpur Obscene Dance: अश्लील नृत्य करत पैशाची उधळण करणारा हा व्हिडिओ धक्कादायक आहे. काही कर्मचारी अति उत्साहाच्या भरात तिथे उपस्थित असलेल्या तरुणीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होते तर अनेक जण हातात मोबाईल धरून तिचे हे अश्लील नृत्य रेकॉर्ड करत होते.

Pravin Dabholkar | Updated: Jul 11, 2023, 01:30 PM IST
कॉर्पोरेट पार्टीत अश्लील डान्स, अतिउत्साही कर्मचाऱ्यांकडून नर्तकीवर....', नागपूरला कलंक लावणी घटना title=

अमर काणे, झी मीडिया, नागपूर: सार्वजनिक ठिकाणी अश्लील नृत्य करण्याचे फॅड सध्या राज्यातील प्रमुख शहरांमध्ये फोफावताना दिसत आहे. याला नागपूर शहर देखील अपवाद राहिले नाही. नागपूर शहराच्या वेशीवर असणाऱ्या एका हॉटेलमध्ये कॉर्पोरेट पार्टी दरम्यान अश्लील डान्सवर पैश्याची उधळण होणार व्हिडिओ आता सोशल माध्यमांवर व्हायरल झालेला आहे.

नागपूरच्या वर्धा रोडवरील शहराच्या वेशीवर असलेल्या हॉटेलमध्ये हा प्रकार घडला. येथे तोकडे कपडे घालून एक तरुणी डान्स करत होती.  तर दुसरीकडे कोर्पोरेट कर्मचारी तिच्यावर पैशांची उधळत करत होते. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये अश्लील नृत्यासमोर कॉर्पोरेटमध्ये कर्मचारी मौज मजा करताना दिसत आहेत.

कंपनीसाठी चांगलं काम करणाऱ्यांना डीलरसाठी या पार्टीचे आयोजन झाल्याची माहिती मिळत आहे

मात्र अशा पद्धतीने अश्लील नृत्य करत पैशाची उधळण करणारा हा व्हिडिओ धक्कादायक आहे. काही कर्मचारी अति उत्साहाच्या भरात तिथे उपस्थित असलेल्या तरुणीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होते तर अनेक जण हातात मोबाईल धरून तिचे हे अश्लील नृत्य रेकॉर्ड करत होते.

बेलतरोडी पोलीस स्टेशन हद्दीत एका हॉटेलमध्ये घडलेल्या या प्रकरणात पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी यासंदर्भात गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्याची माहिती समोर येत आहे

काही दिवसापूर्वी नागपूरच्या उमरेड करांडला येथील एका हॉटेलमध्ये अशाच पद्धतीने अश्लील नृत्य आणि पैसे उधळण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यानंतर नागपूर ग्रामीण पोलिसानी कारवाई केली होती.