एकतर्फी प्रेमातून चाकू हल्ला झालेल्या सानिका थुगावकरचा मृत्यू

नागपुरातील सानिका थुगावकरची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे.

Updated: Sep 21, 2018, 10:46 PM IST
एकतर्फी प्रेमातून चाकू हल्ला झालेल्या सानिका थुगावकरचा मृत्यू title=

नागपूर : नागपुरातील सानिका थुगावकरची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे. ऑरेज सिटी रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. सुमारे अडीच महिन्यापूर्वी १ जुलैला रोहित हेमानानी या तरुणाने तिच्यावर एकतर्फी प्रेमातून आठ रस्ता चौकात चाकूनं हल्ला केला होता. सानिका  थुगावकर सोमलवार महाविद्यालयात टेक्सटाईल पदविका अभ्याक्रमाला शिकत होती.बालपणापासून मामाकडेच राहणा-या सानिकाचे शिक्षणही मामाकडे राहूनच सुरु होते. .सानिकावर १ जुलैला रोहित हेमनानी या तरुणाने सानिकावर हल्ला केल्याची घटना मामा अविनाश पाटणे यांच्यासमोरच घडली होती.

आठ रस्ता चौकाजवळ मामाच्या कार्यालयालजवळच रोहित सानिकाशी बोलत होता. तेव्हा रोहितने सानिकाला फेसबुक फ्रेंड रिक्वेस्ट रिजेक्ट का केली असा सवाल केला होता. तेव्हा मला मैत्रीसंबंध ठेवावयचे नसल्याचे सांगून सानिका मागे फिरली. त्यानंतर  रोहितनं सानिकावर चाकून हल्ला केला होता. तेव्हा सानिकाला वाचवताना तिचा मामाही जखमी झाला होता.

रोहितने केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेली सानिका गेल्या अडीच महिन्यांपासून मृत्यूशी झुंज देत होती. मात्र गुरुवारी तिचा हा संघर्ष संपला. आपल्या लाडक्या भाचीच्या मृत्यूनंतर सानिकाच्या मामांचे  दु:ख तर अनावर झालंय. सानिकाच्या मारेक-यालाही कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.