Tadoba Video : ताडोबात वाघाची नागपंचमी, दुर्मिळ क्षणाचा Video पाहिला का?

Tadoba Viral Video : नागपंचमीच्या मुहूर्तावर ताडोबातील वाघ आणि कोब्राचा दुर्मिळ क्षण सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

नेहा चौधरी | Updated: Aug 9, 2024, 03:41 PM IST
Tadoba Video : ताडोबात वाघाची नागपंचमी, दुर्मिळ क्षणाचा Video पाहिला का?  title=
Nagpur Tadoba Video viral Nag Panchami a rare moment in Tadoba cobra and tiger

Tadoba Viral Video : नागपूर - चंद्रपूर जवळील ताडोबा हे वाघांसाठी खूप प्रसिद्ध आहे. वाघाचा दर्शनसाठी अनेक असंख्य पर्यटक जात असतात. अगदी सचिन तेंडुलकर कुटुंबासोबत ताडोब्यात जात असतो. ताडोबा हा व्याघ्र प्रकल्प म्हणून नावारुपाला आले आहे. ताडोबा जंगलातील वाघाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. या बफर क्षेत्रात छोटा मटका, नयनतारा, भानुसखिंडी, वीरा यांच्या दर्शनासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येतात. छोटा मटका, नयनतारा, भानुसखिंडी, वीरा यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असता. (Nagpur Tadoba Video viral Nag Panchami a rare moment in Tadoba cobra and tiger)

ताडोबात वाघाची नागपंचमी

नागपंचमीच्या मुहूर्तावर ताडोब्यातील एक व्हिडीओ सर्वांच लक्ष वेधून घेतलंय. नागपंचमी, शनिवार आणि रविवारची सुट्टी साधून अनेक पर्यटक ताडोब्यात फिरण्यासाठी गेले आहेत. अशात त्यांना एक अद्भूत आणि दुर्मिळ दृश्य पाहिला मिळालं. नागपंचमीच्या पूर्वसंध्येला वाघ आणि क्रोबा तो 25 मिनिटांचा क्षण अनेकांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केला. जंगलाचा राजा आणि वीरा वाघिणीचा पूत्र कालूला कोब्राने वेठीस धरलं. 

तब्बल 25 मिनिटं कोब्राने फणा काढून वाघाला एकाच जागेवर बसून ठेवलं. तब्बल अर्धा तास वाघ आणि कोब्रा एकमेकांच्या समोरासमोर होते. वाघाच्या आजूबाजूला इतर वन्य प्राणी भीतीने जवळ फिरकतही नाही. पण नागपंचमीच्या पूर्वसंध्येला मात्र फणा काढून एका कोब्राने वाघाला हैराण केलं. 

ताडोबातील बेलारा बफर झोनमध्ये ही घटना घडली हे आपण आश्चर्य व्यक्त केलं. वाघ आणि कोब्रा आमने-सामने असल्याचे हे दृश्य नागपुरातील वन्यजीवप्रेमी नितीन घाटे यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केलंय. एका ओढ्याच्या बाजूला कोब्रा आणि कालु वाघ एकमेकांकडे टक लावून पाहत होते. मात्र नागपंचमीच्या पूर्वसंध्येला वाघाने कोब्रावर कोणताच हल्ला चढवला हे विशेष. किंबहुना नागपंचमीच्या पूर्वसंध्येला कोब्राचा मान ठेवत त्याला जाऊ दिले, असं म्हणं वावग ठरणार नाही.