अनभिज्ञ असल्याचं भासवत वाघिणीची विद्यूत वेगानं शिकारीवर झडप, पाहा व्हिडिओ

 वाघ जंगलातील वन्यप्राण्याची शिकार करताना व्हिडिओ

Updated: Jan 6, 2021, 09:32 AM IST

अमर काणे, झी मीडिया, नागपूर : वाघ जंगलातील वन्यप्राण्याची शिकार करताना एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. पेंच व्याघ्र प्रकल्पातील हा व्हिडिओ आहे. सुमारे तीन दिवसांपूर्वी चोरबाहुली गेटजवळ एका पर्यटकानं हा व्हीडिओ काढलाय.

वाघ सांभाराच्या पिल्लाची शिकार करताना या व्हीडिओत दिसत आहे. घाटमारा नावाच्या वाघिणनं ही शिकार केली आहे. घाटमारा वाघीण जंगलात फिरत असताना तिला ही शिकार दिसली. 

थोडा वेळ आपलं जणू काही लक्ष नसल्याचं दाखवत घाटमारा वाघिणीनं अगदी विद्युत वेगानं आपल्या शिकारीवर झडप टाकली. शिकार घेवून
ती लगेच तिथून निघून गेली.

हा पूर्ण चित्त थरारक प्रसंग कॅमरात चित्रित झालाय. गेल्या काही महिन्यांपासून नागपूर नजिकच्या पेंचच्या जंगलात व्याघ्रदर्शन हमखास होत असल्यानं पर्यटकांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे.