...म्हणून नाना पटोले उद्धव ठाकरेंवर भडकले; महाविकास आघाडीत खूप मोठा वाद

लोकसभा निवडणुकीत महाविकासघाडीने घवघवीत यश मिळवले आहे. यामुळे महायुतीवर दबाव आला आहे. अशातच आता महाविकास आघाडीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.  विधान परिषदेच्या निवडणुकीवरून नाराजी नाट्य रंगले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले  हे उद्धव ठाकरे यांच्यावर भडकले आहेत. 

वनिता कांबळे | Updated: Jun 11, 2024, 04:27 PM IST
...म्हणून नाना पटोले उद्धव ठाकरेंवर भडकले; महाविकास आघाडीत खूप मोठा वाद title=

Nana Patole Vs Uddhav Thackeray : लोकसभा निवडणुकीत महाविकासघाडीने घवघवीत यश मिळवले आहे. यामुळे महायुतीवर दबाव आला आहे. अशातच आता महाविकास आघाडीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.  विधान परिषदेच्या निवडणुकीवरून नाराजी नाट्य रंगले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले  हे उद्धव ठाकरे यांच्यावर भडकले आहेत. 

विधान परिषदेच्या निवडणुकीवरून काँग्रेसमध्ये तीव्र संताप आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाने परस्पर विधान परिषदेच्या चारही जागा घोषीत केल्याने काँग्रेस नेते नाराज झाले आहेत. महाविकास आघाडी असताना घोषणा करण्याच्या आधी चर्चा केली पाहिजे होती अशी काँग्रेसची भूमिका आहे.  उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेमुळे काँग्रेसचे प्रभारी रमेश चन्नीथला आणि काँग्रेस नेते संतप्त झाले आहेत. कोकण पदवीधर आणि नाशिकच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही आहे. मात्र, लोकसभा जागा वाटपाप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी परस्पर उमेदवार घोषीत केल्याने काँग्रेस नेते  संतापले आहेत. 

उमेदवार मागे घ्या.... 

राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाचा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. एकदा महाविकासआघाडीच्या नेत्यांनी एकत्र बसून वाटाघाटी करुन उमेदवारी देण्याबाबतचा निर्णय जाहीर केला पाहिजे.  पण त्यांनी परस्पर उमेदवार जाहीर केले आहेत.  कोकण आणि नाशिक मधून आमची तयारी आहे. नाशिक शिक्षक आणि कोकण पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी मागे घ्यावी अशी काँग्रेसनं ठाकरेंकडे मागणी केली आहे. वारंवार आम्ही उद्धव ठाकरेंशी फोनवर संपर्क साधण्याचा प्रय्तन करत आहोत. मात्र, संपर्क झालेला नाही. चर्चा करुन  उमेदवारीचा निर्णय घेतला पाहिजे. नाना पटोले खूपच संतापले आहेत. नाना पटोलेंनी आज ठाकरेंची भेट घेणंही टाळलं आहे. 

नेमकं काय म्हणाले नाना पटोले

विधानपरिषदेच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीत वाद असल्याची नाना पटोलेंनी माहिती दिलीये...विधानपरिषदेच्या चारही जागा उद्धव ठाकरेंनी परस्पर जाहीर केल्याचा आरोपही पटोलेंनी केलाय..मात्र, महाविकास आघाडीम्हणून गोष्टी व्हाव्यात चारही जागा जिंकता येतील असं आवाहनही त्यांनी ठाकरेंना केलंय...मविआमध्ये कोणताही निर्णय चर्चेअंती आणि एकमताने जाहीर व्हावा अशी अपेक्षाही नाना पटोलेंनी व्यक्त केलीये...तर नाशिक आणि कोकणासाठी काँग्रेस आग्रही असल्याचंही ते म्हणालेत...त्यांना प्रत्युत्तर देताना ठाकरे गटाचे अंबादास दानवेंनी कोकण आणि नाशिक हे ठाकरे गटाच्या परंपरागत जागा असल्याचं म्हटलंय...