लग्नात DJ लावण्यावरुन वाद झाला, 22 वर्षीय तरुणाच्या जीवावर बेतला... धक्कादायक घटना

लग्नाच्या रिसेप्शन (Wedding Reception) कार्यक्रमात डी जे लावण्याच्या कारणावरून एका 22 वर्षीय युवकाची हत्या करण्यात आली. नांदेड शहरातील कर्मवीर नगर मध्ये ही घटना घडली. 

Updated: Nov 22, 2022, 07:33 PM IST
लग्नात DJ लावण्यावरुन वाद झाला, 22 वर्षीय तरुणाच्या जीवावर बेतला... धक्कादायक घटना title=

सतीश मोहिते, झी मीडिया, नांदेड: सध्या आजूबाजूला अनेक धक्कादायक प्रकार हे घडत असतात. सध्या अशाच एका प्रकारानं सगळीकडेच खळबळ (Shocking News) माजवून दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सुरक्षेसंबंधीचा प्रश्न उपस्थित झाला आहे. हा प्रकार धक्कादायक असून या प्रकारानं एका तरूणाला आपला जीव गमावावा लागला आहे. लग्नाच्या रिसेप्शन (Wedding Reception) कार्यक्रमात डी जे लावण्याच्या कारणावरून एका 22 वर्षीय युवकाची हत्या करण्यात आली. नांदेड शहरातील कर्मवीर नगर मध्ये ही घटना घडली. (nanded 22 years young boy got killed due to DJ sound conflict crime news marathi)

काय घडली घटना ? 

कर्मवीर नगर मधल्या शेख कुटुंबातील विवाह सोहळ्याचा स्वागत समारंभ होता. डी जे (DJ) लावण्याच्या कारणावरून यावेळी युवकांमध्ये वाद झाला. कार्यक्रमातून निघून गेल्यानंतर काही वेळाने सात ते आठ तरुण कार्यक्रम स्थळी आले आणि त्यांनी थेट शेख मोईन शेख इकबाल याच्यावर चाकूने हल्ला केला. छातीत चाकु खुपसल्याने मोईन चा मृत्यू झाला. त्या नंतर आरोपीला अटक करावे या मागणीसाठी नातेवाईकांनी मयताचा मृतदेह पोलीस ठाण्यात आणला होता. त्यामुळे काहीकाळ तणाव (Tension) निर्माण झाला होता. खून झालेला असताना मयताच्या नातेवाइकांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला.  

लग्न असंही... 

लग्नासाठी आता कसलंच बंधन उरलेलं नाही. ना वयाचं, ना रंग-रुपाचं, ना पैशांच. तसेच आता उंचीचंही कसलं बंधन उरलं नाही असं म्हटलं तर काही वावगं ठरू नये. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ (Wedding Video) पाहून तुम्हीही म्हणाल की या दोघांची तर रब ने बना दी जोडी (Rab ne Bana Jodi) असंच म्हणाल. तुम्हाला माहिती नसेल तर आता आम्ही तुम्हाला सांगतो की व्हिडीओ कोणता ते. या व्हिडीओत एक जोडपं विवाहबंध होताना दिसत आहे. या जोडप्याकडे जर तुम्ही नीट पाहिलं तर तुम्हाला समजेल की या विवाहबंध (Getting Married) होताना दिसत आहेत ज्यांची उंची फक्त 3 फूट आहे. 

अशाही घडतात घटना :

मेव्हणी आणि वऱ्हाडी मंडळींचा आग्रह पाहून नवरदेव हसत हसत नाव घेण्यास सुरुवात करतो. 'छंद पकाइया-छंद पकाइया, छंद के ऊपर ताली, अगला छंत तब सुनाऊंगा. जब 5 पप्पी देगी साली.', असं नाव घेताच सर्वांना हसू आवरत नाही. इतकंच काय तर होणारी नवरीदेखील हसत दाद देते. दुसरीकडे नवरदेव (Groom) असं नाव घेईल याची मेव्हणीला कल्पना देखील नव्हती. त्यामुळे तीही गाळातल्या गाळात (Smiling) हसते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Social Media) होत आहे. तर दुसरीकडे असाच एक प्रकारही घडला आहे.  सोशल मीडिया हा व्हायरल व्हिडीओचा खजिना आहे. नवदेवाचं (Groom) हे रोमँटिक (Romantic) होणं, अचानक नवरदेव आणि नवरीचं (Bride) किस (kiss) करणे असे अनेक व्हिडीओ आपण पाहिले आहेत. पण या नवरदेवाने तर चक्क हद्दच केली. लग्न मंडपात वऱ्हाडीसमोर नवदेवाने माहेरी जाण्यावरुन नवरीला धमकी दिली.