close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

महावितरणच्या कंत्राटदाराची आत्महत्या, व्यापाऱ्याला अटक

उद्योजक चंद्रकांत गव्हाणे यांना अटक 

Updated: Jul 12, 2018, 01:48 PM IST

नांदेड : नांदेडमध्ये एका कंत्राटदाराने स्वत:वर गोळी झाडून घेऊन आत्महत्या केलीय. सुमोहन कनगला असं या कंत्राटदाराचं नाव असून तो महावितरणचा कंत्राटदार होता. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी नांदेडमधील एका मोठ्या व्यापाऱ्यासह इतर दोघांचा उल्लेख केल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. 

या प्रकरणी पोलिसांनी नांदेड येथील प्रसिद्ध उद्योजक चंद्रकांत गव्हाणे यांना अटक केलीय. आर्थिक  कारणांतून कनगला यांनी हे पाऊल उचलल्याचं पोलिसांनी म्हटलंय. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.