close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

आरटीओनं गाडी पकडली म्हणून आत्महत्येचा प्रयत्न...

त्याला उदगीरच्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं

Updated: Jul 12, 2018, 01:37 PM IST

लातूर : लातूर जिल्ह्यातील उदगीरच्या शहर पोलीस ठाण्यात एका युवकाने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याला उदगीरच्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं कल्लेश्वर भगवान पांचाळे असं या तरुणाचं नाव आहे... तो स्कूल व्हॅन चालवतो... आरटीओने गाडी पकडल्यामुळे संतापाच्या भरात त्यानं हे टोकाचे पाऊल उचललं... पत्नीचे दागिने विकून त्यानं स्कूल व्हॅन घेतलीय.