नांदेड : चमच्यापासून एलसीडीपर्यंत अनेक वस्तूंचे नांदेड पोलिस स्टेशनसमोर प्रदर्शन लागलय.
प्रदर्शनातील अनेक वस्तू अनेकांच्या केवळ ओळखीच्याच नाही तर काही स्वतःच्याच मालकीच्या असल्याचे आढळून येतय. सीसीटीव्हीत चोरी करताना सापडलेल्या चोराकडून सुमारे दोन ट्र्क इतका माल हस्तगत करण्यात आला आहे.
हबीब मोहम्मद हुसेन एका घरामध्ये चोरी करताना सीसीटीव्हीमध्ये दिसला. त्यानं चोरलेली एक दुचाकी दिसली आणि या दुचाकीचा माग काढत पोलीस हबीबपर्यंत पोहोचले. पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता शौचालयाची काच फोडून पळून जाण्याचा त्यानं प्रयत्न केला आणि त्यात तो जखमी झाला. पोलीसांनी त्याच्या घराची झडती घेतली. त्यावेळेस लॅपटॉप, टीव्ही, फ्रीजपासून ते चमचा, भांडी, मिक्सरपर्यंत वस्तू पाहून पोलिसही आवाक झाले.
मुळचा हैदराबादचा असलेला हबीब काही महिन्यांपासून नांदेडच्या देगलुर नाका भागात भाड्याच्या घरातो. घरफोड्यांचे 27 गुन्हे या चोरट्याने कबुल केलेत. अंदाजे 20 लाखांचा मुद्देमाल पोलीसांनी आतापर्यंत हस्तगत केलाय. या चोरट्याचे आणखी कोणी साथीदार आहेत का, त्यानं आणखी कुठेकुठे आणि कायकाय चोरलंय याचा तपास पोलीस करतायत. मात्र या महाचोर कारनामे पाहुन नांदेडकर अवाक झालेत.