नांदेड : मराठवाड्यात मान्सुन दाखल झाला नसला तरी मान्सुनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावलीये... पहिल्यांदाच प्रसिद्ध सहस्त्रकुंड धबधबा मान्सुनपूर्व पावसानेच ओसंडुन वाहत आहे... गेल्या आठ महिन्यापासुन कोरडा पडलेला सहस्त्रकुंडचा धबधबा गुरुवारी मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसाने पुन्हा प्रवाहीत झाला...त्यामुळे निसर्गनिर्मीत सहस्त्रकुंडच्या धबधब्याचे विहंगमदृष्य पर्यटकांना अनुभवता येणार आहे... गेल्यावर्षी कमी पावसामुळे लवकरच धबधब्याची धार बंद झाल्याने पर्यटकांना या धबधब्याचा आनंद घेता आला नव्हता... यंदा मात्र जुन महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात धबधबा ओसंडून वाहत असल्याने पर्यटकही आनंदून गेले आहेत.