पांढरा, लाल, तपकिरी रंगांच्या घोड्यांनी सजली 300 वर्ष जूनी अश्वयात्रा, सारंगखेडच्या घोडेबाजारात करोडोंची उलाढाल

300 year old ashwayatra: अश्व पंढरी म्हणून लौकिक असलेल्या नंदुरबार (nandurbar news) जिल्ह्यातील सारंखेडाच्या यात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. दोन हजारपेक्षा अधिक घोडे या ठिकाणी खरेदी विक्रीसाठी दाखल झाले असून तापी नदीच्या किनारी कडाक्याच्या थंडीमध्ये अश्वप्रेमींना ही यात्रा आकर्षित करीत आहे.

Updated: Dec 9, 2022, 05:41 PM IST
पांढरा, लाल, तपकिरी रंगांच्या घोड्यांनी सजली 300 वर्ष जूनी अश्वयात्रा,  सारंगखेडच्या घोडेबाजारात करोडोंची उलाढाल title=
horse news

प्रशांत परदेशी, झी मीडिया, नंदुरबार: अश्व पंढरी म्हणून लौकिक असलेल्या नंदुरबार (nandurbar news) जिल्ह्यातील सारंखेडाच्या यात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. दोन हजारपेक्षा अधिक घोडे या ठिकाणी खरेदी विक्रीसाठी दाखल झाले असून तापी नदीच्या किनारी कडाक्याच्या थंडीमध्ये अश्वप्रेमींना ही यात्रा आकर्षित करीत आहे. पहिल्या दोन दिवसात दीडशे घोड्यांची विक्री यात्रेत झाली आहे. पांढरे... लाल ... तपकिरी... बहुरंगी... अशा रंगीबेरंगी अश्वांनी ही यात्रा सजली आहे. यंदाची सारंगखेडा येथील अश्वयात्रा लोकप्रिय ठरली आहे. (nandurbar news 300 year old ashwayatra in nandurbar begins)

करोनानंतर पूर्ण क्षमतेने यावर्षी अश्वयात्रा भरल्याने अश्वशौकीनही या ठिकाणी मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत. सारंगखेडा यात्रेला दत्त जयंतीपासुन सुरुवात झाली असून आता येथील घोडे बाजार रंगतदार आणि अलीशान होत आहे. यावर्षी दोन हजाराहून अधिक घोडे खरेदी विक्रीसाठी दाखल होणार असल्याचा अंदाज आयोजकांकडून वर्तवण्यात आला आहे.

गेल्या दोन दिवसांमध्ये 150 घोड्यांची विक्री झाली असून त्यातून 44 लाख रुपयाची यात उलाढाल झाली आहे. या यात्रेला तीनशे वर्षापेक्षा अधिक वर्षांची परंपरा आहे. या यात्रेत हजारो पासून तर करोडो रुपयांपर्यंतचे घोडे विक्रीसाठी दाखल होत असतात. सारंगखेडा यात्रा मारवाडी, पंजाबी, काठेवाडी, सिंधी, आणि ब्लडलाईनचे घोडे (Horse types) विक्रीसाठी दाखल होत असतात. 

यंदा काय आहे खास? 

सारंगखेडा देशातील एकमेव यात्रा आहे जी फक्त अश्वसाठीच प्रसिद्ध आहे. अनेक राज्यातील यात्रा या रद्द करण्यात आल्या होत्या मात्र सारंगखेडा कुठलाही परिणाम पडला नसून मोठ्या संख्येने घोडे दाखल होत आहेत. अनेक वर्षापासून सारंगखेडा यात्रेत अश्व पाहण्यासाठी आणि खरेदी करण्यासाठी अशोप्रेमींची येथे रेलचेल पाहायला मिळते अनेक अशोक इतर यात्रा सुरू झाल्यापासून तर थेट संपेपर्यंत सारंखेडा लाच मुक्कामी राहतात. आपापल्या कुवेतीप्रमाणे घोड्याची पसंती या ठिकाणी करता येते असा या बाजाराचा लौकिक आहे. सारंगखेडा (sarangkheda) या चेतक फेस्टिवलमध्ये जातिवंत, रुबाबदार आणि शानदार अश्व पाहण्याची पर्वणी आहे, या पर्वणीचा सहकुटुंब आनंद घेण्यासाठी आणि मुलांचा अश्वांची दुनिया दाखवण्यासाठी एकदा अवश्य या यात्रेला भेट द्या.