Price Hike: लाल मिरच्यांची किंमत वाढता वाढता वाढे... तुमच्या खिशावर होणार असा परिणाम?

महाराष्ट्रात मिरचीचे आगार म्हणून प्रसिद्ध असलेल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये मिरचीला विक्रमी दर मिळत आहेत. 

Updated: Nov 3, 2022, 10:11 AM IST
Price Hike: लाल मिरच्यांची किंमत वाढता वाढता वाढे... तुमच्या खिशावर होणार असा परिणाम?  title=

प्रशांत परदेशी, झी मीडिया, नंदुरबार: लाल मिरच्यांचा उपयोग आपण आपल्या आहारात कायमच करत आलेलो आहोत. दाल तडका (Dal Thadka) असो वा अन्य काही खुशखुशीत पदार्थ, आपल्या आहारात कायमच लाल मिरच्यांचा फायदा होतो. परंतु लाल मिरच्यांचे भावही कधी कडाडतील याचा काही नेम नाही. यंदाही असाच प्रकार पाहायला मिळाला आहे. सध्या मिरचीचे भावही गगनाला भिडल्याचे पाहायला मिळत आहेत. (nandurbar news record prices for wet red chillies)

महाराष्ट्रात मिरचीचे आगार म्हणून प्रसिद्ध असलेल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये मिरचीला विक्रमी दर (Price Hike) मिळत आहेत. मात्र उत्पन्न कमी आणि उत्पादन खर्च अधिक असल्याने हे विक्रमी दरही शेतकऱ्यांना परवडेनासे झाले असल्याचे मिरची उत्पादक सांगत आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत मिरचीला दुप्पट दर मिळत असल्याने, आतापर्यंतचे हे दर सर्वाधिक असल्याचं सांगितलं जात आहे. मिरचीतील दरांची भाव वाढ ही अशीच कायम राहण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे. या दरवाढीचा फटका सर्वसामान्यांच्या किचन मधील फोडणीला बसणार आहेत.

प्रत्येक घरातल्या किचनमध्येच जेवणातला सर्वात महत्त्वाचा पदार्थ आहे तो चटणी आणि यंदा चटणी (How to make Chuntey at Home) ही चांगलीच भाव खात असल्याचा दिसून येत असल्याने सर्वसामान्यांचा किचन मधील बजेट कोलमळणार, असेच दिसून येत आहे. सर्वीकडे भाव वाढीचा फटका सहन करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना आता चटणीसाठी ही अधिकचे पैसे मोजावे लागणार असल्याचे चित्र नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत फेरफटका मारल्यानंतर दिसून येत आहे. 

हेही वाचा - Video : घराला लागली आग! लग्नासाठी जमवलेले 85 हजार रोख पैसे आणि सोने जळून खाक

मिरचीच्या ही दरात मागच्या वर्षाचा दुप्पट दरवाढ झाली असून देशातील दुसऱ्या क्रमांकाची मिरचीचे बाजारपेठ (Market) असलेल्या नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समिती ओल्या लाल मिरचीला आज पर्यंतच्या सर्वाधिक 6 हजार पासून 12 हजार पर्यंत दर मिळत आसल्याने चटणीचा दर ही दुप्पट होणार आहे. आतापर्यंत तीस हजार क्विंटल हून अधिक मिरची ची खरेदी झाली असून. मात्र वाढलेले हे दर शेतकऱ्यांच्या पत्यावर पडताना दिसून येत नाही. मिरचीचे उत्पन्न कमी झालेला आहे, त्यामुळे ही दरवाढ झाली असल्याचा शेतकरी (Farmers) सांगतात.

हेही वाचा - Video : घराला लागली आग! लग्नासाठी जमवलेले 85 हजार रोख पैसे आणि सोने जळून खाक

एकरी खर्चाच्या तुलनेत मिळणारे दर हे कमीच असल्याचा शेतकऱ्यांचा दावा आहे. यावर्षी नैसर्गिक संकट आणि किडींचा प्रादुर्भावामुळे मिरचीचे उत्पन्न घटला आहे. त्यामुळे या भाव वाढीचा लाभ हा शेतकऱ्यांच्या पदरी पडणार नसल्याचे शेतकरी सांगतात. 

बाजार समितीत ओल्या मिरचीचे दर सरासरी प्रतिक्विंटल 8 हजारावर गेले आहेत. तर सर्वाधिक दर यंदा 12 हजार रुपये देण्यात आला आहे. त्यामुळे दररोज शंभर ते दीडशे वाहनातून हजारो क्विंटल मिरची विक्रीसाठी दाखल होत आहे. तर ओल्या लाल मिरचीला अजून भाव वाढण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.

महाराष्ट्र पाठोपाठ आंध्रप्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटक (Karnataka) मध्ये ही पाऊस आणि नैसर्गिक आपत्तीमुळे उत्पादनात घट येण्याची शक्यता असल्याने मिरचीचे रॅकेट स्पिड पकडला आहे. मिरचीचे दर येणाऱ्या काळातही असेच कायम राहतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना चटणी महागड्या दरात विकत घ्यावी लागणार असली तरी त्याचा लाभ हा शेतकऱ्यांच्या पदरात पडणार नाही हेच खरे.