close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

नारायण राणेंची शिवसेनेवर खरमरीत टीका

उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उत्तर

Updated: Oct 22, 2019, 02:49 PM IST
नारायण राणेंची शिवसेनेवर खरमरीत टीका

रत्नागिरी : शिवसेनेत कोणीही उठतं आणि तोंडाला येईल ते बोलतं, अशी खरमरीत टीका नारायण राणे यांनी शिवसेनेवर केली आहे. विधानसभा प्रचारात उद्धव ठाकरे यांनी राणे कुटूंबियांवर सडकून टीका केली होती. या टीकेला वांद्र्यांत येऊन प्रत्युत्तर देणार असल्याचं राणे यांनी म्हटलं होतं. मात्र, शिवसेनेला उत्तर देण्यास मी बांधील नसल्याची प्रतिक्रिया आज नारायण राणे देत होते.

शिवसेनेच्या उमेदवारांना कोण ओळखतं असा सवाल करत नितेश राणे ५० हजार मतांनी विजय होतील, असा विश्वास नारायण राणेंनी व्यक्त केला आहे. तर कणकवलीत गुलाल शिवसेनेचा उधळेल, असा विश्वास शिवसेनेचे उमेदवार सतीश सावंत यांनी व्यक्त केला आहे.

शिवसेनेला बेस काय आहे?. तोंडाला येईल ते बोलायचं. विजय कशाच्या आधारे होणार. भाजप १३५ च्या वर जाणार. मला वाटत नाही एक्झिट पोल प्रमाणे आकडेवारी येतील. असं देखील नारायण राणे यांनी म्हटलं आहे.