नरेंद्र दाभोलकर हत्या : तपास शून्य, अंनिसचे 'जवाब दो' आंदोलन

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला येत्या २० ऑगस्ट रोजी ४ वर्षे पूर्ण होत असून मारेकऱ्यांना अटक करण्यात पोलिसांना अद्यापही यश आले नाही. याचाच जाब विचारण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आजपासून  २० जुलै ते २० ऑगस्ट दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात 'जवाब दो' आंदोलनाची घोषणा केली आहे. 

Updated: Jul 20, 2017, 08:58 PM IST
नरेंद्र दाभोलकर हत्या : तपास शून्य, अंनिसचे  'जवाब दो' आंदोलन title=
संग्रहित छाया

पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला येत्या २० ऑगस्ट रोजी ४ वर्षे पूर्ण होत असून मारेकऱ्यांना अटक करण्यात पोलिसांना अद्यापही यश आले नाही. याचाच जाब विचारण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आजपासून  २० जुलै ते २० ऑगस्ट दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात 'जवाब दो' आंदोलनाची घोषणा केली आहे. 

या आंदोलनाद्वारे संपूर्ण महाराष्ट्रातील अंनिसचे कार्यकर्ते त्या त्या भागातील आमदार आणि खासदाराच्या घरी जाऊन यासंदर्भात जाब विचारणार आहे. तसेच हा प्रश्न त्यांनी विधिमंडळात उपस्थित करावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली.  

नरेंद्र दाभोळकर खूनप्रकरणी सीबीआय चौकशीत सारंग अकोलकर आणि विनय पवार यांची नावं समोर आली आहेत. पण ते अजूनही सापडले नाहीत. म्हणून  १ लाख पोस्टर तयार करून ती महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात लावण्यात येणार आहेत.