close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवड अपघातात एकाच कुटुंबातील तीन ठार

 मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवडच्या राहुड घाटातील रेणुकादेवी मंदिराजवळ अपघात होऊन एकाच कुटुंबातील तीन जण ठार तर एक जण जखमी झाला. 

Updated: Jan 24, 2019, 04:50 PM IST
मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवड अपघातात एकाच कुटुंबातील तीन ठार

नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवडच्या राहुड घाटातील रेणुकादेवी मंदिराजवळ अपघात होऊन एकाच कुटुंबातील तीन जण ठार तर एक जण जखमी झाला. वणी येथील समदडीया कुटुंब धुळे येथून सकाळी परत येत असताना त्यांच्या कारचा टायर फुटल्याने त्यांची कार समोर उभ्या असलेल्या बसला मागून धडकली. त्यात तिघे जण ठार झालेत तर एक जखमी झाला. जखमीवर चांदवडच्या शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत  आहे. 

कार भरधाव वेगाने जात असताना टायर फुटल्याने गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी उभ्या असलेल्या एसटीला मागून धडकली. वेगामुळे कार बसच्या खाली चेपली गेली. यात कारचा चेंदामेंदा झाला. त्यामुळे कारमधील तिघे जण जागीच ठार झालेत.

पाहा हा व्हिडिओ :