द्राक्षाच्या शेतात आधी वार केले, नंतर 100 फूट लांब ओढत नेलं; 17 वर्षाच्या मुलाकडून 32 वर्षीय महिलेची हत्या

Nashik Crime : बहिणीचे प्रेमसंबंध जुळवून दिल्याचा राग मनात धरुन एका अल्पवयीन मुलाने 32 वर्षीय महिलेवर धारदार शस्त्राने वार करत आणि स्कार्फने गळा आवळून निर्घृण खून केला आहे. गेल्या आठवड्यात नाशिकच्या चांदवड तालुक्यात हा सगळा धक्कादायक प्रकार घडला आहे.

आकाश नेटके | Updated: Jul 11, 2023, 09:02 AM IST
द्राक्षाच्या शेतात आधी वार केले, नंतर 100 फूट लांब ओढत नेलं; 17 वर्षाच्या मुलाकडून 32 वर्षीय महिलेची हत्या title=

चेतन कोळस, झी मीडिया, नाशिक : गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये (Nashi Crime) गुन्हेगारीच्या घटनांमध्ये बऱ्याच प्रमाणात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. पोलीस (Nashik Police) प्रशासनाकडून गुन्हेगारी रोखण्याचा प्रयत्न केला जात असला तरी गंभीर घडताना दिसत आहे. अशातच एका अल्पवयीन मुलाने 32 वर्षीय महिलेचा निर्घृणपणे खून केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकच्या चांदवडमध्ये (chandwad) घडला आहे. नाशिक पोलिसांनी याप्रकरणी अल्पवयीन मुलाला अटक गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास सुरु केला आहे.

गेल्या आठवड्यात सकाळच्या सुमारास चांदवड तालुक्यातील धोंडगव्हाण वाडी येथे हा सगळा धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. अल्पवयीन मुलाने 32 वर्षीय महिलेला द्राक्षेच्या बागेत नेऊन धारदार शस्त्राने वार करत हत्या केली आहे. आरोपीने महिलेवर वार केल्यानंतर दोरीने तिचा गळाही आवळल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी 17 वर्षीय अल्पवयीन मुलावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी मुलाने  दोरीच्या सहाय्याने महिलेला फरफटत ओढत नेऊन तिच्या मृतदेह शेताच्या बाजूला टाकून पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न केला. मृत महिलेच्या पतीने वडनेरभैरव पोलिसांत फिर्याद दिल्यानंतर  काही तासांत अल्पवयीन मुलास ताब्यात घेण्यात आले.

वडनेरभैरव पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, सुरगाणा तालुक्यातील पाथर्डी सालभोये येथील मृत महिला आणि तिचा पती धोंडगव्हाण वाडीत शेतमजुरीचे कामकाज करतात. मृत महिलेचा मामेभाऊ दोघांना भेटण्यासाठी नेहमी धोंडगव्हाण वाडीत यायचा. यावेळी मृत महिलेच्या शेजारी राहणाऱ्या एका मुलीसोबत तिच्या भावाचे प्रेमसंबध होते. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. मात्र बहिणीचे प्रेमसंबंध मृत महिलेनच जुळवून दिल्याचा राग मनात अल्पवयीन मुलाच्या मनात होता. याच रागातून त्याने महिलेला द्राक्षाच्या शेतात नेले. 

त्यानंतर अल्पवयीन मुलाने महिलेवर धारदार शस्त्राने हल्ला केला. त्यानंतर स्कार्फच्या सहाय्याने गळा आवळून तिचा खून केला. मृत महिलेचे शरीर दोरीच्या सहाय्याने 100 फूट लांब ओढत नेऊन तिच्यावर उसाचे पाचट टाकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच वडनेरभैरव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरु केला. मृत महिलेच्या पतीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी काही तासांत अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं आहे.

भक्ताकडून मांत्रिक महिलेची हत्या

नाशिकच्या शिंदे गावात गेल्या आठवड्यात एका मांत्रिक महिलेची तिच्याच भक्ताने हत्या केल्याचा प्रकार समोर आला होता. जनाबाई भिवाजी बर्डे अस मयत झालेल्या महिलेचे नाव आहे. नाबाई बर्डे सुख-दु:खाचे बघणे, बाहेरचे बघणे, त्यावर मार्ग, तोडगा सांगत असे. आजूबाजूच्या परिसरातील लोक तिच्याकडे उपायांसाठी येत होते. तिच्याकडे संशयित निकेश दादाजी पवार हा देखील दोन वर्षांपासून त्याच्या समस्येवर मार्ग काढण्यासाठी येत होता. मात्र त्याचे समाधान होत नसल्याने तो बराच अस्वस्थ होता. याच रागातून त्याने जनाबाईची चाकूने वार करुन हत्या केली होती.