दोन मुलींची हत्या करत महिलेने स्वतःला संपवले, नाशिकच्या महिलेने उचलले धक्कादायक पाऊल, कारण...

Nashik Crime News: नाशिकमध्ये एका महिलेने दोन मुलींची हत्या करुन आत्महत्या केली आहे. पतीच्या त्रासाला कंटाळून तिने हे पाऊल उचलले आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: May 8, 2024, 03:36 PM IST
दोन मुलींची हत्या करत महिलेने स्वतःला संपवले, नाशिकच्या महिलेने उचलले धक्कादायक पाऊल, कारण...
nashik news wife killed her 2 child and later ended her life

Nashik Crime News:  नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीने दोन मुलींची हत्या करुन स्वतः आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्येपूर्वी महिलेने एक व्हिडिओदेखील बनवला आहे. मुली आणि आईच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होते आहे. तसंच, पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. 

Add Zee News as a Preferred Source

पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीने आपल्या दोन लहान मुलीची हत्या करून स्वतः बिल्डिंग वरून उडी घेत आत्महत्या केली आहे. नाशिकच्या आडगाव परिसरात ही घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे, महिलेने आत्महत्या करण्यापूर्वी मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवला होता.

नाशिकच्या आडगाव परिसरात आज एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पती आणि सासरकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून अश्विनी निकुंभ या विवाहित महिलेने आपल्या दोन मुलांना विष देऊन स्वतः आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. परिसरातील नागरिकांनी घटना आडगाव पोलिसांना सांगितल्यानंतर आडगाव पोलीस घटनास्थळी दाखल होऊन तपास करत असताना धक्कादायक माहिती समोर आली आहे. अश्विनी यांनी आत्महत्या करण्यापूर्वी आपले पती स्वप्नील निकम आणि त्याचा भाऊ आणि बहीण यांच्या नावाने सुसाइड लिहून तसेच आपल्या मोबाईलमध्ये देखील याबाबत व्हिडिओ बनवला आहे. आई आणि मुलींचा सुसाईड करण्यापूर्वीचा हृदय हलवणार व्हिडिओ समोर आल्याने एकच हळहळ  व्यक्त करण्यात येत आहे. 

चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीची केली हत्या 

चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना दारावे गावात घडली. पत्नीच्या हत्येनंतर मारेकरी पती पश्चिम बंगालला पळून जाण्याचा बेत आखत होता. मात्र पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध नेरुळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दारावे गावातील लालबानू सरदार (वय 45) यांचा मृतदेह घरात आढळून आला. मुलगा घराबाहेर गेला तेव्हा ती घरात एकटीच होती. लाल बानूची डोक्यात जड वस्तूने वार करून हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. याशिवाय घटनास्थळी पोलिसांना रक्ताने माखलेले फरशीचे तुकडे आणि चाकूही सापडले आहेत. यानंतर पोलीस पथकाने तातडीने तपासाचा आग्रह धरला आणि उस्मानला अटक केली. चौकशीत त्याने सांगितले की, पत्नीच्या भांडणात त्याने पत्नीच्या डोक्यात लाडीने वार करून तिचा खून केल्याची कबुली दिली.

About the Author

Mansi kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्रा टाइम डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि अर्थ (infrastructure) या विषयात विशेष रुची आहे. त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड. इन्फ्रास्ट्रक्चर आणि गुन्हे या बातम्यांमध्ये हातखंडा.

...Read More