close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

एटीएम मशिन चोरून गाडीत ठेवताना सापडले

आयसीआयसीआय बँकेचे एटीएम मशीन चोरी करण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला आहे. 

Updated: Sep 24, 2019, 01:52 PM IST
एटीएम मशिन चोरून गाडीत ठेवताना सापडले

नाशिक : आयसीआयसीआय बँकेचे एटीएम मशीन चोरी करण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला आहे. पोलिसांनी हटकल्यानंतर चोरट्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. नाशिक येथील त्र्यंबकेश्वर रोडवरील पपया नर्सरी जवळ हा प्रकार घडला. चोरट्यांना पळ काढताना पोलिसांवर हल्ला चढवला. 

पपया नर्सरी येथील आयसीआयसीआय बॅंकेच्या एटीएमवर चोरट्यांचा अनेक दिवसांपासून डोळा होता. हे एटीएम पळवण्याची योजना ते बरेच दिवसांपासून आखत होते. आज पहाटे ४ वाजता त्यांनी ही योजना प्रत्यक्षात आणण्यास सुरुवात केली. 

एटीएम मशीन काढून चारचाकी वाहनात घेउन जाण्याचा त्यांचा प्रयत्न होता. पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार हाणून पडला. पोलिसांनी काही मिनिटातच पंचवटी परिसरात पाठलाग करत तिघांना ताब्यात घेतले आहे. तरीही तिघेजण फरार होण्यात यशस्वी ठरले आहेत.