सासरी पोहोचताच खोलीत गेली नववधू, विधी पूर्ण व्हायच्या आधीच घडलं असं काही की लग्नचं मोडलं

Trending News In Marathi: लग्न झाले, वरात घरी आले लग्नाचे विधी सुरू होण्यापूर्वीच घडलं असं काही की लग्नच तुटले. नेमकं काय झालं वाचा सविस्तर बातमी 

मानसी क्षीरसागर | Updated: Oct 3, 2024, 09:33 AM IST
सासरी पोहोचताच खोलीत गेली नववधू, विधी पूर्ण व्हायच्या आधीच घडलं असं काही की लग्नचं मोडलं title=
Neither abuse nor money this UP man mariage broken due to luteri dulhan

Trending News In Marathi: धुमधडाक्यात लग्न लागले नवरदेव त्याच्या पत्नीला घेऊन घरी आला. नातेवाईकदेखील आनंदात होते. घरात उत्साहाचे वातावरण होते. मात्र हा आनंद फार काळ टिकू शकला नाही. लग्नानंतर काहीच वेळात घरात वाद सुरू झाले आणि लग्नही मोडलं. नंतर हे प्रकरण पोलिस ठाण्यात पोहोचले. मात्र पोलिस चौकशीत जे समोर आलं त्यामुळं नवरदेव व त्याच्या कुटुंबीयांच्या पायाखालची जमिनच सरकली. 

27 सप्टेंबर रोजी मुकेश नावाच्या व्यक्तीने बबराला गावातील एका व्यक्तीसोबत ओळख झाली. त्या व्यक्तीने 50 हजार रुपयांत त्याचे लग्न लावून देणार असल्याचे सांगितले. मुकेशने त्याला सुरुवातीला 30 हजार रुपये दिले आणि उर्वरित 20 हजार रुपये त्याला नंतर करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर त्या व्यक्तीने त्याच्यात घरातील दोन मुलींची स्थळे त्याला दाखवली. एकीचे नाव मोना होते तर एकीचे नाव मुस्कान असं होतं. त्याने मुस्कानला पसंद केले आणि लग्न करुन तिला घरी घेऊन आला. 

लग्नानंतर मुस्कान सासरी आली आणि लगेचच एका खोलीत जाऊन बसली. रात्री 12 वाजण्याच्या सुमारास विधी पूर्ण होण्याअगोदरच तिने मुकेशकडून 20 हजार रुपयांची मागणी केली. तेव्हा मुकेशने तिला सांगितले की माझ्याकडे आता पैसे नाहीयेत. तेव्हा मुस्कानने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. तसंच, रात्री 12 वाजता 112 नंबरवर फोन करुन पोलिसांना सांगितले. तसंच, सासरच्यांनी तिला बंधक बनवल्याचा आरोप केला. पोलिसही तातडीने घटनास्थळी पोहोचले. 

मुकेशनेही त्याच्यासोबत लग्नाच्या नावाने फसवणूक झाल्याचा आरोप केला. तसंच, त्याच्याकडून पैसे घेण्यात आल्याचंदेखील त्याने सांगितले. नववधुचं गुपित समोर येताच तिने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र तेव्हाच पोलिसांनी तिला पकडले. त्यानंतर पोलिसांनी ती लुटेरी दुल्हन असल्याचं सांगितले. तसंच, पोलिसांनी एका टोळीसह दोन महिलांना अटक केली आहे. 

एसपी कृष्ण कुमार बिन्शोई यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी रजपुरा ठाणे परिसरातील एका व्यक्तीने पोलिसांत तक्रार दाखल केली होती की, त्याच्या एका मित्राने एका पंडितसोबत त्यांची ओळख करुन दिली होती. त्यानंतर पंडितने 50 हजार रुपये देऊन त्याचे लग्न लावून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर त्याने मोना आणि मुस्कान या दोघींसोबत त्याची ओळख करुन दिली होती. पीडित मुकेशने त्याला सुरुवातीला पैसे दिले आणि उर्वरित पैसे लग्नानंतर देणार असल्याचं सांगितले. त्यानुसार दोघांचं लग्नदेखील झाली. मात्र, लग्नाच्याच दिवशी या टोळीचा भांडाफोड करण्यात आला. मुस्कानने दिलेल्या कबुलीजबाबात मोना-मुस्कान आणि पंडित हे एक टोळी चालवत असून ते अशाचप्रकारे लग्नासाठी इच्छुक असलेल्या तरुणांना फसवतात.