Petrol-Diesel वरून नवनीत राणा यांचा CM उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

Updated: May 21, 2022, 07:53 PM IST
Petrol-Diesel वरून नवनीत राणा यांचा CM उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल title=

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पेट्रोल डिझेलचे दर कमी करून जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी माझे कुटुंब माझी जबाबदारी पार पाडावी. केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलवरील टॅक्स कमी करण्याच्या निर्णयाचं स्वागत करत खासदार नवनीत राणा यांनी ही मागणी केली आहे.

'केंद्र सरकार मागील सात महिन्यात पेट्रोल डिझेल मध्ये कपात केली आहे आणि उज्ज्वला गॅस मध्ये कपात करून देशातील जनतेला दिलासा दिला आहे. आता महाराष्ट्र सरकारची बारी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माझे कुटूंब माझी जबाबदारी चांगली समजते. माझा महाराष्ट्र माझी जबाबदारी हे केव्हा कळेल. हा प्रश्न सर्व महाराष्ट्र पाहत आहे.'

'महाराष्ट्र सरकार आता पेट्रोल डिझेलच्या किमंती कमी करून दिलासा देणार आहे का? केंद्राकडे बोट दाखवता तर मग केंद्रा सारखे कामे करा.' असं देखील खासदार नवनीत राणा यांनी म्हटलं आहे.

पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होणार आहे. मोदी सरकारनं हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय. त्यानुसार पेट्रोलचे दर साडे नऊ रुपयांनी, तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त होणार आहे. त्याशिवाय उज्ज्वला योजनेतील गॅस सिलिंडरच्या दरात 200 रूपयांनी कपात करण्यात येणार आहे.

देशवासियांसाठी हा मोठा दिलासा आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या अबकारी करात कपात करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय. त्यामुळं पेट्रोल डिझेल स्वस्त होणार असल्याने त्यामुळं दरवर्षी तब्बल 1 लाख कोटी रुपयांच्या उत्पन्नावर सरकारला पाणी सोडावं लागणार आहे. 

केंद्राकडून पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी केल्यानंतर राज्याने देखील करात कपात करुन नागरिकांना दिलासा देण्याची मागणी याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. भाजपशासित राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्यात आले आहेत. पण महाराष्ट्रात करात कपात करण्यात आलेली नाही.