मंत्री धमकावतात म्हणून पोलीस अधिकाऱ्याची बदलीची मागणी

पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी दाखल केलेल्या मानहाणी प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी दोंडाई पोलीस ठाण्यातील दोन अधिकाऱ्यांना धमकावल्याची धक्कादायक माहिती समोर येतेय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Feb 17, 2018, 09:11 PM IST
मंत्री धमकावतात म्हणून पोलीस अधिकाऱ्याची बदलीची मागणी  title=

धुळे : पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी दाखल केलेल्या मानहाणी प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी दोंडाई पोलीस ठाण्यातील दोन अधिकाऱ्यांना धमकावल्याची धक्कादायक माहिती समोर येतेय.

या प्रकरणी पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी पोलीस स्टेशन डायरीत याची नोंद घेतली असून पोलीस अधीक्षकांकडे मानसिक तणावात असल्यामुळे बदलीची मागणी केलीय. मलिक यांनी फोनवरून धमकवल्याचा आरोप पोलीस नोंदीत आहे.

तर काँग्रेसचे माजी मंत्री डॉ. हेमंत देशमुख हे देखील वारंवार दबाव आणत सरकारी कामात अडथळा निर्माण करताहेत. त्यामुळे आपली बदली करण्यात यावी अशी मागणी पाटील यांनी वरिष्ठांकडे पाठवलेल्या पत्रात केलीय.