Byculla Murder : भायखळ्यात मध्यरात्री राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या तालुकाध्यक्षाची हत्या

Mumbai News Today: मुंबईतल्या भायखळा परिसरात एका व्यक्तीवर काल रात्री अज्ञाताकडून जीवघेणा हल्ला करण्यात आला. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या तालुकाध्यक्ष असल्याची माहिती मिळत आहे.

मानसी क्षीरसागर | Updated: Oct 5, 2024, 01:28 PM IST
Byculla Murder : भायखळ्यात मध्यरात्री राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या तालुकाध्यक्षाची हत्या title=
ncp ajit pawar party byculla taluk president sachin kurmi killed by unknown people

Mumbai News Today: मुंबईत भायखळा येथे शुक्रवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या भायखळा तालुकाध्यक्षाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शुक्रवारी रात्री अज्ञात व्यक्तीकडून जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. यात त्यांचा मृत्यू झाला आहे. सचिन कुर्मी असं या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेने भायखळा परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या भायखळा येथील तालुकाध्यक्ष सचिन कुर्मी यांची हत्या करण्यात आली आहे. भायखळा येथील म्हाडा कॉलनीच्या मागे शुक्रवारी रात्री 12च्या सुमारास घडली आहे. या हल्ल्यात सचिन हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, सचिन कुर्मी हे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष असल्याची माहिती मिळत आहे. शुक्रवारी रात्री 12 वाजेच्या सुमारास त्यांच्यावर अज्ञातांनी धारदार शस्त्रांनी वार केले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. जे.जे रुग्णालयात त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता. भायखळा पोलिस सध्या हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. 

आर्थिक वादातून ही हत्या झाली असावी असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसंच, आरोपींचा शोध घेण्यासाठी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. आत्तापर्यंत कोणालाही अटक करण्यात आली नसून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. तर, कुर्मी यांच्या हत्येमुळं त्यांचे समर्थक आक्रमक झाले आहे. 

दरम्यान, नांदेडमध्येही एक धक्कादायक प्रकार घडला होता. फेसबुक पोस्ट टाकण्याच्या कारणावरुन ठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखास मारहाण करत तलवारीने बोट छाटल्याचे प्रकरण समोर आले होते. भाजपच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. उद्धव ठाकरे पक्षाचे उपशहरप्रमुख संतोष वडवळे यांनी काही आक्षेपार्ह पोस्ट टाकल्या होत्या. या पोस्टमुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी तुप्पा येथून काल रात्री वडवळे यांचे गाडीमध्ये अपहरण केले. एका फार्महाऊसवर नेऊन त्यांना बेदम मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे.