शिवसेनेला पाठिंबा देण्यावरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बैठका

शिवसेना राज्यात सरकार स्थापन करण्याच्या मार्गावर...

Updated: Nov 11, 2019, 11:02 AM IST
शिवसेनेला पाठिंबा देण्यावरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बैठका title=

मुंबई : शिवसेना-भाजपमधील सत्तास्थापनेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे आता सर्वच राजकीय पक्षांमध्ये जोरदार खलबतं सुरु आहे. भाजप सत्ता स्थापनेचा दावा करणार नसल्याने आता शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी आमंत्रण देण्यात आलं आहे. पण शिवसेनेला आता बहुमताचा आकडा घेण्य़ासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मदत घ्यावी लागणार आहे. यावरुन शिवसेनेने दोन्ही पक्षाच्या नेत्यांसोबत चर्चा केल्याची देखील माहिती आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची वाय बी चव्हाण सेंटरमध्ये बैठक सुरु आहे. या बैठकीत शिवसेनेला पाठिंबा द्यायचा का याबाबत चर्चा होणार असल्याचं वृत्त आहे. तर दुसरीकडे काँग्रेसची दिल्लीत काही ठराविक नेत्यांची बैठक होते आहे. काँग्रेसही शिवसेनेला पाठिंबा देणार का याबाबत या बैठकीत विचार विनिमय सुरु आहे. तर शिवसेनेलाही आज आपलं बहुमत सिद्ध करायचं असल्याने सेनेच्याही काही बैठका होत आहेत. फोन वरून चर्चा सुरु आहे. तर आमदारांकडून सेनेला पाठिंबा असल्याच्या स्वाक्षऱ्याही घेतल्या जात आहेत.

'काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी आज परीक्षेची वेळ आहे. भाजपचा मुख्यमंत्री होऊ नये अशी त्यांची ही भूमिका होती. आता शिवसेना पुढे निघून गेली आहे. तसेच मला आशा आहे की, ते ही सोबत येतील. भाजपचं शिवसेनेविरोधात मोठं षडयंत्र आहे. राज्यातील पक्ष हे राष्ट्रद्रोही नाही आहेत. काही मुद्द्यावर मतभेद असतात. ते भाजपसोबत पण होते.' असं देखील संजय राऊत यांनी म्हटलं आहे.