'आमच्या सर्कशीत प्राणी आहेत, विदुषक हवाय'; पवारांचा सॉल्लिड प्रतिटोला

सिंह यावर काय म्हणणार? 

Updated: Jun 9, 2020, 06:25 PM IST
'आमच्या सर्कशीत प्राणी आहेत, विदुषक हवाय'; पवारांचा सॉल्लिड प्रतिटोला  title=

मुंबई : राज्यात सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा उल्लेख सर्कस म्हणून करणाऱ्या केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना खुद्द राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनीच सडेतोड उत्तर दिलं आहे. 

आमच्या सर्कसमध्ये प्राणी आहेत, विदुषकाची कल्नाही आहे. पण, विदुषकाची मात्र कमतरता आहे, या शब्दांत त्यांनी राजनाथ सिंहांचा खरपुस समाराच घेतला तोही अगदी आपल्याच शैलीत. निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसललेल्या कोकणातील वादळग्रस्त भागाला भेट देण्यासाठी म्हणून पाहणी दौऱ्यावर असताना शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली. 

 

राजनाथ सिंह यांनी व्हर्च्युअल रॅलीद्वारे महाराष्ट्रातील भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला त्याचवेळी त्यांनी महाराष्ट्रात सध्या सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडीच्या कारभारावर निशाणा साधला होता. आपल्या वक्तव्यादरम्यान त्यांनी सर्कशीची उपमा देत एका नव्या वादाला वाचा फोडली. ज्याचे पडसाद आता राजकीय वर्तुळात उठू लागले आहेत.

कोकणाला केंद्र आणि राज्य सरकारने धोरण ठरवून मदत केली पाहिजे- शरद पवार

 

इथे शरद पवारांना राजनाथ सिंहांना सणसणीत प्रतिटोला दिला असतानाच तिथे शिवसेनेकडूनही त्यांच्या या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं काम अगदी सुसूत्रतेने सुरु असून, उलटपक्षी मध्य प्रदेश, गुजरातमध्येच सर्कस सुरु असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेच्या अरविंद सावंत यांनी दिली. सोबतच केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी लडाख मुद्द्यावर जास्त लक्ष द्यावं असा सूरही त्यांनी आळवला.