राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अपघातात गंभीर जखमी

Chandrapur accident : ब्रह्मपुरी तालुक्यात ट्रॅक्टर आणि कार यांच्यात भीषण रस्ता अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष हे अपघातात गंभीर जखमी झाले आहेत.  

Updated: Jan 27, 2022, 11:39 AM IST
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अपघातात गंभीर जखमी title=

चंद्रपूर : Chandrapur accident : जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यात ट्रॅक्टर आणि कार यांच्यात भीषण रस्ता अपघात झाला. (Car-tractor accident) या अपघातात एकाचा मृत्यू झाला. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष हे अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (NCP leader and former Zilla Parishad vice president seriously injured in the Chandrapur accident)

रणमोचन गावाजवळ झालेल्या रस्ते अपघातात ट्रॅक्टर  आणि कार यांच्यात जोरदार धडक झाली. कारमधील एकाचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर आहे. गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी जि. प. उपाध्यक्ष अतुल गण्यारपवार अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. तर त्यांचे चुलत भाऊ आनंद यांचा घटनास्थळी मृत्यू झाला.

अतुल गण्यारपवार यांना ब्रह्मपुरीच्या खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. धडक एवढी भीषण होती की ट्रॅक्टरचे  दोन तुकडे झाले आहेत. पोलीस आणि विविध राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य केले.