'या सरकारनं आता गुजरातची...' जयंत पाटील यांची शिंदे-फडवणीस सरकारवर जोरदार टीका...

पुण्यात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) वतीने शिंदे सरकारकडून जी पोलीस भरती रद्द करण्यात आली आहे. त्याच्या निषेधार्थ प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आलं आहे. यावेळी ते बोलत होते.

Updated: Nov 3, 2022, 06:02 PM IST
'या सरकारनं आता गुजरातची...' जयंत पाटील यांची शिंदे-फडवणीस सरकारवर जोरदार टीका...  title=

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे: राज्याचे सर्व प्रकल्प हे गुजरातला (Gujraat) पळवून नेण्याच काम सुरू आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री हे धिम्मपणाने बघत बसले आहे. महाराष्ट्रात सुशिक्षित असलेल्या तरुणांची मोठ्या प्रमाणावर निराशा झाली आहे. फॉस्कोन (Foxconn) सारखं प्रकल्प आला असता तर किमान 4 ते 5 लाख तरुणांना रोजगार मिळालं असता तसेच एअर बससारखे प्रकल्प देखील राज्यातून बाहेर गुजरातला गेले आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की या सरकारने आत्ता गुजरातची चाकरी करण्याचे ठरविले आहे. महाराष्ट्रापेक्षा (Maharashtra News) गुजरातची सेवा करण्यासाठी सरकार स्थापन करण्याचा कटकारस्थान केलं गेलंय. महाविकास आघाडी सरकारने जे निर्णय घेतले होते तसेच जे भरती करण्याबाबत निर्णय घेण्यात आलं होते ते देखील बदलण्यात आले आहेत. अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant patil) यांनी केली आहे. (ncp leader Jayant Patil strongly criticizes Shinde-Fadvanis government on project wen to gujarat political news marathi)

पुण्यात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) वतीने शिंदे सरकारकडून जी पोलीस भरती रद्द करण्यात आली आहे. त्याच्या निषेधार्थ प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आलं आहे. यावेळी ते बोलत होते.

पोलीस भरती संदर्भात विरोधक सरकारवर टीका करत आहे. पण माहविकास आघाडी सरकारने देखील तसे प्रयत्न केले नाही. याबाबत पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले की माहिती अधिकारात किंवा माहिती घेताना जी माहिती पाहिजे तेवढीच माहिती देण्याचा प्रगात या सरकारने सुरू केलं आहे. या सरकारला हे सिद्ध करायचं आहे की आम्ही माहविकास आघाडीपेक्षा किती चांगले आहोत. या सरकारचा आत्मविश्वास (Self Confidence) कमी झाला आहे. गुजरात पुढे या सरकारच काहीही चालत नाहीये, असं देखील यावेळी पाटील म्हणाले. 

राज्यस्तरीय रोजगार मेळाव्याअंतर्गत 75 हजार तरुणांना रोजगार मिळणार आहे याच्या जाहिरात सर्वच वृत्तपत्रात तसेच सामनामध्ये देखील आल्या आहेत. या बाबत टिका केली जात आहे यावर पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले की सगळ्या पेपर वर जाहिराती आहेत, सामन्याच्या मुख पृष्ठवर जाहिरात आहे. वर्तमान पत्रात जाहिरात आली की ती घ्यावी लागते. पण सामना (Samanna) पेपरमध्ये आतमध्ये काय लिहिलं आहे हे पाहावं कारण जी जाहिरात पहिल्या पानावर दिली आहे, त्याच सत्य आतमध्ये आहे.आणि या सरकारच डोकंच ठिकाणावर नाही. म्हणून त्यांनी सामनाला जाहिरात दिली आहे, असा टोला देखील यावेळी पाटील यांनी लगावला.

हेही वाचा - Video : घराला लागली आग! लग्नासाठी जमवलेले 85 हजार रोख पैसे आणि सोने जळून खाक

प्रताप सरनाईक यांच्यावर पुन्हा ईडीच्या (ED) वतीने कारवाई सुरू करण्यात आली आहे, यावर पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की सरनाईक हे खाजगीत काहीतरी म्हटले असेल म्हणून ही कारवाई सुरू करण्यात आली आहे असं देखील यावेळी पाटील म्हणाले.

राज्याच्या सहकार संस्थानाची सीबीआयमार्फत चौकशी सुरू करण्यात येणार आहे. यावर पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले की राज्य सरकारच्या एजन्सी मार्फत जर चौकशी केली असती तर ते चांगलं झालं असतं. पण या सरकारला पोलिसांवर विश्वास नाही. प्रत्येक गोष्ट केंद्राच्या (Central Government) मार्फत करावी हे योग्य नाही. हे जे सुरू आहे ते टार्गेट करण्यासाठी सुरू आहे. हे भारतातील सर्वांना माहीत आहे, असं देखील यावेळी पाटील म्हणाले.

हेही वाचा - Video : घराला लागली आग! लग्नासाठी जमवलेले 85 हजार रोख पैसे आणि सोने जळून खाक

भिडे गुरुजी यांनी जो वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.त्याबाबत पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले की मनोहर भिडे (Manohar Bhide) यांना मी कधीही भेटलो नाही. त्यांच्या इथे जात नाही. ते माझ्या आईच्या निधनाच्या वेळेस भेटायला आले होते तेवढाच एक प्रसंग बाकी मी त्यांना कधीच भेटलो नाही. त्यांच्या कोणत्याही विधानाचा मी कधीही समर्थन देखील केलेलं नाही. त्यांनी काल जे विधान केलं आहे. ते महिला वर्गाचं अपमान करणार वक्तव्य आहे. राज्यातील सर्व महिला त्यांचा निषेध करतील. अशी प्रवृत्ती ही आजची सत्तारूढ सरकार जोपासत आहे. हे महाराष्ट्राच्या महिलांनी नोंद घेणं आवश्यक आहे, असं देखील यावेळी पाटील म्हणाले.