Rupali Chakankar On Chitra Wagh: अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित दादांना 25 ते 30 आमदार असल्याचे बोलले जाते. कोणते नेते अजित दादांसोबत जाणार? यावर भाजप-सेनेतील नेत्यांच्या काय प्रतिक्रिया असणार? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान रुपाली चाकणकर या अजित दादांच्या गटामध्ये आहेत. त्यांचे विविध विषयांवरुन भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यासोबत झालेले वाद सर्वांनी पाहिले आहेत. दोघींचा एक सेल्फीदेखील सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होतोय. आता रुपाली चाकणकर यांना चित्रा वाघ यांच्याबद्दल काय वाटतंय? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर रुपाली चाकणकर यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली.
पुन्हा एकदा प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी मला अजित पवार यांनी मला दिली आहे. अजितदादांकडे आलो आणि काम झालं नाही, असं कधी झालं नाही. त्यामुळे इथे येणारा कार्यकर्ता रिकाम्या हाती जाणार नाही, असे चाकणकर म्हणाल्या.
2024 च्या निवडणुकीत राष्ट्रावादीचा मतदानाचा जो टक्का वाढलेला असेल तो राष्ट्रवादीच्या महिला संघटनमुळे असेल, असे त्या म्हणाल्या.
यावेळी रुपाली चाकणकर यांनी शरद पवार यांच्याबद्दलही भाष्य केले. आजही शरद पवार माझे आदर्श आहेत. आमचे दैवत शरद पवार आहेत आणि राहणार असेही त्या म्हणाल्या.
महिला आयोगाच्या अध्यक्ष असताना मी प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करू शकत नाही असं म्हणून माझा राजीनामा घेतला गेला. त्यामुळे मी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याचे चाकणकर म्हणाल्या. माझ्याच बाबतीत हा अपवादात्मक नियम का लावला गेला? असा प्रश्न त्यांनी विचारला.
माझ्या आयुष्याचा उभारीचा काळ मी संघटनेला दिला. दरम्यान पुण्यात एकही कार्यक्रमाला मला बोलावले नाही तर मलाही याची माहिती मिळाली पाहिजे असेही त्यांनी म्हटले.
आमचा विचार कोणाच्या विरोधात नाही पण तुम्ही आम्हाला बोलायला लावलं तर आमच्याही शब्दाला धार आहे, हे लक्षात ठेवावे असा इशारा रुपाली चाकणकर यांनी दिला.
यावेळी त्यांनी चित्रा वाघ यांच्याबद्दल भाष्य केले. नेते एकत्र काम करत असताना आम्ही आमची विधारधारा घेऊनच काम करतो. आम्ही त्यांच्या विचारधारेला पाठींबा नाही.त्यांच्या झेंड्याखाली आम्ही काम करत नाही, असे रुपाली चाकणकर यांनी स्पष्ट केले.
दादा उपमुख्यमंत्री असल्याने माझ्या कामाला गती मिळेल. तसेच कार्यकाळ संपेपर्यंत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरच असेल, असे चाकणकर यावेळी म्हणाल्या.