राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळेंनी बदललं भाजपचं नाव, म्हणाल्या...

अंधेरी पोटनिवडणुकीमुळे राज्यातील वातावरण तापलेलं पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडी सरकार पडल्यापासून शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं आहे. या सरकारवर विरोधक निशाणा साधताना दिसत आहे अशातच राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट भाजपचं नामकरण करत मिश्किल टोला लगावला आहे. (NCP MP Supriya Sule changed the name of BJP said Bharatiya Janata Laundry)

Updated: Oct 16, 2022, 05:32 PM IST
 राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळेंनी बदललं भाजपचं नाव, म्हणाल्या... title=

सागर आव्हाड, झी मीडिया पुणे : अंधेरी पोटनिवडणुकीमुळे राज्यातील वातावरण तापलेलं पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडी सरकार पडल्यापासून शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं आहे. या सरकारवर विरोधक निशाणा साधताना दिसत आहे अशातच राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट भाजपचं नामकरण करत मिश्किल टोला लगावला आहे. (NCP MP Supriya Sule changed the name of BJP said Bharatiya Janata Laundry)

आता भारतीय जनता लॉन्ड्री मध्ये तो आधी भारतीय जनता पक्ष होता.त्यांच्या आणि आमच्या विचारात वैचारिक मतभेद होते.पण नात्यात कटुता कधीच नव्हती.आता लॉन्ड्री झाली आहे याचं कारण अनेक पक्षांमध्ये सगळे म्हणजे त्यांचे ओरिजिनल पेक्षा बाहेरचे गेलेले लोक जास्त दिसत असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. पुण्यातील उरळी देवाची येथे एका कार्यक्रमावेळी त्या बोलत होत्या.

कुठलंही व्यासपीठ बघा तिथे मला आनंद वाटतो की भारतीय जनता पक्षाच्या आणि लॉन्ड्रीच्या आता पक्षाच्या व्यासपीठावर आमचे राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसमधून गेलेले एवढे एवढे मोठे नेत्यांना एवढी संधी दिली आहे. त्याबद्दल मी भारतीय जनता लॉन्ड्रीचे आभार मानते, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या. 

भाजप नेत्यांकडे आता बोलण्यासारखं काही उरलं नसून त्यांची दडपशाही सुरू आहे. ज्यांनी भाजपला वाढवला अगदी ज्यांनी माईक लावण्यापासून कामे केलीत ते कार्यकर्ते कुठे आहेत?, असा सवालही सुप्रिया सुळेंनी केला. यावेळी बोलताना, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर काही टीका केल्याशिवाय दिवस जात नाही, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.