रायगड : मुंबई-गोवा महामार्गावर पावसाळ्यात पडलेल्या खड्डयांमुळे या महामार्गाची चाळण होऊन मोठया प्रमाणात दुरवस्था झालीय. गणेशोत्सव तोंडावर आल्यानंतरही या महामार्गाची दुरुस्ती होत नसल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसनं रायगड जिल्हापरिषदेच्या अध्यक्षा आदीती तटकरे आणि युवा नेते अनिकेत तटकरेंच्या नेतृत्वाखाली आंदोलन केलं.
रोहा शहरात मोर्चा काढून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. टाऊन हॉलमधून निघालेला मोर्चा शहरातील प्रमुख रस्त्यावरुन प्रांताधिकारी कार्यालयावर पोहचला. यावेळी प्रांताधिका-यांना निवेदन देण्यात आलं.