NCP-Sharadchandra Pawar Party Symbol : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला अखेर चिन्ह मिळाले आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला तुतारी हे चिन्ह दिले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने चिन्हाचे वाटप केले आहे. चिन्हाचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे शरद पवार प्रचाराची 'तुतारी' फुंकणार आहेत.
राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह अजित पवार गटाला देण्यात आले. त्यानंतर शरद पवार गटानं सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार हे पक्षाचं नाव कायम ठेवण्याचा आदेश सुप्रीम कोर्टानं दिला होता. आठवडाभरात शरद पवार गटाला नवं निवडणूक चिन्ह द्यावं, असे आदेशही सुप्रीम कोर्टानं केंद्रीय निवडणूक आयोगाला दिले होतो. 19 फेब्रुवारी रोजी तातडीची सुनावणी पार पडली.
केंद्रीय निवडणूक आयोगाने चिन्हाचे वाटप केल्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने सोशल मिडियावर नव्या चिन्हाचा फोटो शेअर केला आहे.
"एक तुतारी द्या मज आणुनि
फुंकिन मी जी स्वप्राणाने
भेदुनि टाकिन सगळी गगने
दीर्घ जिच्या त्या किंकाळीने
अशी तुतारी द्या मजलागुनी!"
“महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवरायांच्या शौर्यानं ज्या तुतारीने दिल्लीच्या तख्ताच्याही कानठळ्या बसवल्या होत्या, तीच 'तुतारी' आज निवडणूक चिन्ह म्हणून निश्चित होणं ही 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार'साठी गौरवास्पद बाब आहे. महाराष्ट्राचं आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांनी, आदरणीय खा. शरदचंद्र पवार साहेबांच्या साथीने दिल्लीच्या तख्ताला हादरवून सोडण्यासाठी हीच 'तुतारी' पुन्हा एकदा रणशिंग फुंकण्याकरिता सज्ज आहे!” अशी पोस्ट राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने सोशल मिडियावर शेअर केली आहे.
"एक तुतारी द्या मज आणुनि
फुंकिन मी जी स्वप्राणाने
भेदुनि टाकिन सगळी गगने
दीर्घ जिच्या त्या किंकाळीने
अशी तुतारी द्या मजलागुनी!"“महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवरायांच्या शौर्यानं ज्या तुतारीने दिल्लीच्या तख्ताच्याही कानठळ्या बसवल्या होत्या, तीच 'तुतारी' आज निवडणूक चिन्ह… pic.twitter.com/LsgvjlWzuN
— Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar (@NCPspeaks) February 22, 2024
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचाच असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला. अजित पवार गट हाच मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. अजित पवार गटाकडे 53 पैकी 41 आमदार आहेत, असं नार्वेकरांनी स्पष्ट केलं. दरम्यान, दोन्ही गटांचे आमदार पात्र असल्याचा निकालही नार्वेकरांनी दिला.