भोर, पुणे : पक्षाचा व्हीप (NCP whip) डावलल्याने भोर पंचायत समितीच्या (Bhor Panchayat Samiti) सभापतीसह दोन सदस्यांचे पद रद्द करण्यात आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पाहिल्यांदाच पक्षाचे व्हीप डावल्याने कारवाई झाली आहे. सभापती दमयंती जाधव, सदस्य श्रीधर किंद्रे आणि मंगल बोडके या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन सदस्यांचे सदस्यत्व जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या पदाधिकाऱ्यांना चांगलाच दणका दिला आहे. पक्षाच व्हीप डावलल्याने भोर पंचायत समितीच्या तिघांचे सदस्य रद्द झाले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पाहिलांदाच पक्षाचे व्हीप बजावला होता. मात्र, पक्षाचा व्हीप डावल्याने मोठी कारवाई झाली आहे. पक्षाच व्हीप डावलल्यानं भोर पंचायत समितीच्या सभापतीसह दोन सदस्यांचे पद रद्द करण्यात आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पाहिलांदाच पक्षाचे व्हीप डावल्याने कारवाई झाली आहे.
सभापती दमयंती जाधव यांच्यासह पंचायत समिती सदस्य श्रीधर रघुनाथ किंद्रे आणि मंगल बोडके या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन सदस्यांचे सदस्यत्व जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केले आहे याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील करण्यात आलेलेत्यावर निकाल देत सदस्य पद रद्द करण्याचे आदेश काढण्याचे आला आहे.
पंचायत समितीच्या सभापती निवडीवेळी पक्षाने बजावलेल्या व्हीपचे पालन न केल्याने राष्ट्रवादी पक्षातून हकालपट्टी ही केली होती. त्यानंतर कायदेशीर सदस्य ही रद्द करण्यात आल्याचे या बाबत राष्ट्रवादीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी माहिती दिली आहे.