मुंबई : आजपासून राज्य सरकारनं मुंबईसह राज्यभर प्लास्टिक बंदी लागू केलीये. प्लास्टिक बंदीसाठी सरकारनं दंडात्मक कारवाई निश्चित केलीये. त्यानुसार पहलित्यांदा प्लास्टिक आढळल्यास पाच हजार रुपये, दुसऱ्यांदा प्लास्टिक आढळल्यास दहा हजार रुपये आणि तिसऱ्यांदा प्लास्टिक आढळल्यास २५ हजार रुपये आणि तीन महन्यांचा तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागणार आहे.राज्य सरकारच्या प्लास्टीक बंदीवर आमदार नितेश राणे यांनी कडाडून टीका केलीय. रस्त्यावर पडणारे खड्डे, नालेसफाईच्या कामात होणारा हलगर्जीपणा यावर मुंबई महापालिकेला किती दंड ठोठवावा हा सवाल आता नागरिकांनी विचारला पाहिजे असा सवाल राणे यांनी विचारलाय.
प्लास्टिक बंदीच्या पार्श्वभूमीवर पालिकेनं मुंबईतील विविध भागात ३७ संकलन केंद्र सुरु केलेत.. ओला आणि सुका कचरा संकलन केंद्रातही प्लास्टिक गोळा केलं जात आहे. दरम्यान शुक्रवारपर्यंत पालिकेच्या संकलन केंद्रात १४५ मेट्रिक टन प्लास्टिक गोळा झालंय. प्लास्टिक आढळल्यास कारवाई करण्यासाठी पालिकेनं २५० अधिकारी नेमले असून त्यांना दंडात्मक कारवाईचे आधिकार देण्यात आलेत. प्लास्टिक बंदिसाठी राज्यात पालिका क्षेत्रात आयुक्त तर ग्रामपंयाचत क्षेत्रात ग्रामसेवकांना कारवाईचे अधिकार दिलेत.