Nitesh Rane On Love jihad: समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी (Abu Azmi) यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राज्यातील वातावरण लव्ह जिहाद (Love jihad) प्रकरणावरून तापल्याचं दिसत आहे. या प्रकरणावर भाजप आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) यांनी रोखठोक भूमिका घेत अबू आझमी यांना प्रत्युत्तर दिलं होतं. त्यानंतर आता लव्ह जिहाद कायद्याविषयीही मागणी करत अनेक हिंदूत्ववादी संघटना आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहे. (nitesh rane stressed about love jihad in mahaakrosh morcha in patan marathi news)
पाटणमधील (Patan News) महाआक्रोश मोर्चामध्ये (Mahaakrosh Morcha) भाजपचे आमदार नितेश राणे यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी लव्ह जिहादवरून केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद उभा राहिला आहे. हिंदू मुलींकडे पाहाल तर डोळे काढून म्युझियममध्ये ठेवेन, असा इशारा नितेश राणे (Nitesh Rane On Love jihad) यांनी यावेळी दिला आहे.
आपल्या इथे हिंदूंची संख्या जास्त आहे तरीही मूठभर जिहादी असूनही ते आपल्याला भारी पडत आहेत. असं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांसमोर (Chhatrapati Shivaji Maharaj) नतमस्तक होण्याची कुवत आहे काय?, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. त्यांच्या या वक्तव्यानंतर मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, हिंदू धर्मानं (Hindu) आता जागं झाले पाहिजे. आपल्या समाजातील मुलींवर अन्याय आणि अत्याचार होत असताना कोणतीही कारवाई का केली जात नाही?, असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. लव्ह जिहादची प्रकरणं वाढली तर या भूमीला महाराष्ट्र म्हणतात, असा थेट इशारा देखील त्यांनी यावेळी दिलाय.