close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

'आठ दिवसात काम पूर्ण केली नाही तर...' गडकरींची अधिकाऱ्यांना तंबी

नितीन गडकरींचा आरटीओ अधिकाऱ्यांना इशारा

Updated: Aug 18, 2019, 07:33 PM IST
'आठ दिवसात काम पूर्ण केली नाही तर...' गडकरींची अधिकाऱ्यांना तंबी

नागपूर : आठ दिवसांमध्ये कामं पूर्ण केली नाहीत तर, लोकांना कायदा हातात घेऊन धुलाई करायला लावेन, अशा शब्दांत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी अधिकाऱ्यांना तंबी दिली आहे. नागपूरच्या एमएसएमई सेक्टरमध्ये लघु उद्योग भारतीच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

'मी लोकांमधून निवडून आलेलो आहे, त्यामुळे त्यांना जबाबदार आहे. चोरी करत असाल, तर तुम्ही चोर असल्याचं मी म्हणेन. आरटीओ ऑफिससोबत माझी बैठक झाली. तिकडेही अशाच गडबडी व्हायच्या. या गोष्टी ८ दिवसांमध्ये सुधरा, नाहीतर लोकांना कायदा हातात घ्या आणि धुलाई करा, असं सांगेन. जी व्यवस्था तुम्हाला न्याय देत नाही, तिला उखडून फेकून द्या, असं मला माझ्या गुरूंनी शिकवलं आहे,' असं गडकरी म्हणाले.

व्यवस्था बदलत कशी नाही? लोकांना त्रास झाला नाही पाहिजे, असं वक्तव्य गडकरींनी त्यांच्या भाषणात केलं.