close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

नितीन गडकरींना सोलापुरातील कार्यक्रमात भोवळ

नितीन गडकरी यांना ब्लड प्रेशर आणि शुगरचा त्रास आहे.

Updated: Aug 1, 2019, 01:53 PM IST
नितीन गडकरींना सोलापुरातील कार्यक्रमात भोवळ

सोलापूर: केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांना गुरुवारी सोलापूरमधील एका कार्यक्रमादरम्यान भोवळ आली. राष्ट्रगीत सुरु असताना हा प्रकार घडला. भोवळ आल्यामुळे ते लगेचच खाली बसले. त्यांनी पुन्हा उभे राहण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांच्या अंगरक्षकाने त्यांना सावरले.

यानंतर तातडीने वैद्यकीय पथकाने त्यांची तपासणी केली. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.  त्यांना औषध देण्यात आले असून ते विश्रांतीसाठी कुलगुरूंच्या निवासस्थानी रवाना झाले आहेत.

नितीन गडकरी यांना ब्लड प्रेशर आणि शुगरचा त्रास आहे. यापूर्वी त्यांना शिर्डी येथील प्रचारसभेदरम्यानही नितीन गडकरींना भोवळ आली होती. यावेळी उन्हाचा तडाखा सहन न झाल्याने गडकरी भाषण थांबवून खाली बसले होते. यानंतर डॉक्टरांकडून प्राथमिक तपासणी झाल्यानंतर ते पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले होते. तत्पूर्वी डिसेंबर महिन्यातही राहुरी कृषी विद्यापीठाच्या पदवीदान समारंभातही गडकरींना चक्कर आली होती.

यानंतर मे महिन्यात शिमल्यात प्रचार करत असतानाही त्यांना भोवळ आली होती. किन्नौर जिल्ह्यातील जाहीर सभा उरकून ते हॉटेलवर परत आले. हॉटेलमध्ये आल्यानंतर काही वेळातच त्यांना भोवळ आली होती.